गॅस सिलेंडर पुना महागले; चार आठवड्यात चौथ्यांदा किमती वाढल्या
सोमवारी सलग चौथ्या आठवड्यात चौथ्यांदा एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या. २५ रुपये प्रति सिलेंडर ने किमती वाढवण्यात आल्यामुळे आता प्रती सिलेंडर ८१९ रुपये मोजावे लागणार आहेत.
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असताना आता सिलेंडर महागाईचीही भर पडली आहे. सोमवारी झालेल्या 25 रुपयांच्या वाढीनंतर आता दिल्ली आणि मुंबईत प्रति गॅस सिलेंडर ८१९ रुपये, हैदराबाद मध्ये ८२१.५ रुपये तर कलकत्ता मध्ये 845 रुपये मोजावे लागणार आहेत.
डिसेंबरमध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत प्रत्येकी १०० रुपयांनी वाढ झाली होती.राष्ट्रीय तेल विपणन कंपन्या, भारतीय तेल महामंडळ, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांनी दोनदा किंमतीत ५० रुपयांची वाढ केली होती. जानेवारी महिन्यात यात काहीच बदल झाले नाही. आजच्या वाढीनंतर, गेल्या चार महिन्यात गॅस सिलेंडरची एकूण किंमत २२५ रुपयांनी वाढल्याचे दिसत आहे