गंगुबाई काठीयावाडी’चा टीझर प्रदर्शित.
आलिया भट्ट गंगुबाईच्या भूमिकेसाठी लहान.
२४ फेब्रुवारीला चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसानिमित्त याच दिवशी भंसाळी प्रोडक्शनमध्ये तयार झालेला गंगुबाई काठीयावाडी चित्रपटाचा टिझर पैन मुवीज चैनलवर प्रदर्शित करण्यात आला.

गंगुबाई काठीयावाडीच्या टिझरची सुरुवात बॅकग्राऊंडमध्ये येणाऱ्या आवाजाने होते, ‘कहते हैं कि कमाठीपुरा में कभी अमावस की रात नहीं होती, क्योंकि वहाँ गंगू रहती है.’ यानंतर आलिया भट्ट गंगुच्या भूमिकेत समोर येते. आलिया भट्ट त्या कलाकारांमधून येते जिच्यावर नेपोटिझमचा टॅग असतानाही आपल्या भूमिकेसाठी ओळखली जाते. या ठिकाणी देखील ती आपल्या भूमिकेमध्ये चांगली दिसत आहे.

चाहत्यांचे प्रेम तिला मिळत आहे, परंतु चाहत्यांचा एक मोठा समूह आलियाला या भूमिकेसाठी बरोबर नसल्याचे सांगत आहे. ती या भुमिकेसाठी लहान आहे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा आणखी दुसऱ्या अभिनेत्री आहेत, ज्या या भूमिकेला आणखीन चांगल्या प्रकारे करू शकत होत्या, असे म्हणणे आहे. परंतु १:३१ मिनिटांच्या कोणत्याही छोट्याशा टीचर वरून अंदाज लावणे योग्य ठरणार नाही, यासाठी ३० जुलैला चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पहावी लागेल.
