महाराष्ट्रलाइफस्टाइल

जावयाची गाढवा वरून मिरवणूक काढण्याची परंपरा खंडित

बीड जिल्ह्यातील विडा हे गाव दरवर्षी होळीच्या वेगळ्या रंगासाठी ओळखले जाते. विड्यास दरवर्षी धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवा वरून धिंड काढण्याची परंपरा आहे
होळीचे रंग विडेकर गेली आठ दशकाहून अधिक काळापासून जपत आले आहेत. बारा वाड्या आणि तेरावे विडा अशी विडा गावाची ओळख. भारतात रंगाचा उत्सव दिवाळी, गणेशउत्सवा एवढाच हर्ष उल्हासाने साजरा केला जातो. बीड जिल्ह्यातील विड्याचा रंगही जरासा हटके असतो. हे गाव देशभरात रंगोत्सवाच्या वेगळेपणासाठी ओळखले जाते आहे.दरवर्षी धुळवडीच्य दिवशी जावायची गाढवावरून धिंड काढण्याची गेल्या ऐंशी वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा या गावाने जपलेली आहे.  या परंपरेला जवळपास ८० हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. पण या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीडसह अनेक जिल्ह्यात यंदा जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. होळी, धुलिवंदन यासारखे सण साजरे करण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे गदर्भ सवारीची ही प्रथाही खंडित होण्याची शक्यता आहे.गाढवावर बसून मिरवणूक काढण्याची नामुष्की टाळण्यासाठी जावयांना लपून बसण्याची कसरत करावी लागते. मात्र ही परंपरा या वर्षी पाळली जाण्याची शक्यता कमी असल्याने विड्याच्या जावयांना लपून बसण्याची गरज पडणार नाही.
नेमकी हे प्रथा आहे तरी काय
साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या या विडा गावात 150 घरजावई कायम स्वरुपी वास्तव्यास आहेत. धुलिवंदनाच्या दोन दिवस आधीपासूनच जावईबापूंना शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात पथकंही नेमली जातात. धुलिवंदनाच्या दिवशी त्या जावयाला पकडून गाढवावर बसवण्याची तयारी करण्यात येते

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *