आता ट्रॅव्हलिंग क्षेत्रात फ्लिपकार्टचा प्रवेश,फ्लिपकार्ट खरेदी करणार क्लिअर ट्रीपचे शेअर्स
वॉलमार्टच्या मालकीची असलेली प्लिपकार्ट कंपनी आता ट्रॅव्हल एजन्सी क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. कारण फ्लिपकार्ट लवकरचं क्लिअर ट्रीप ट्रॅव्हल कंपनी खरेदी करणार असून या कंपनीचे १०० टक्के शेअर्स आता फ्लिपकार्टच्या मालकीचे होणार आहेत. क्लिअर ट्रीप कंपनीची विक्री किंमत जवळपास ४० मिनियन डॉलर्स इतकी असल्याचे बोलले जात आहे.
लवकरचं फ्लिपकार्टद्वारे क्लिअरट्रिप कंपनीचे मालकी हक्क घेणार आहे. परंतु ही कंपनी फ्लिपकार्टच्या मालकीची झाली तरी ती ट्रॅव्हलिंग क्षेत्रातच फ्लिपकार्टच्या मालकीचा वेगळा ब्राँन्ड म्हणून काम करणार आहे.दरम्यान क्लिअरट्रिप कंपनीतील कर्मचाऱ्यांना फ्लिपकार्ट पुढेही कामावर ठेवणार आहे.
त्यामुळे ग्राहकांना अधिक सेवा, सुविधा देण्यासाठी फ्लिपकार्ट काम करणार आहे. कोरोनामुळे हॉस्पीटॅलिटी आणि ट्रॅव्हल क्षेत्रातील अनेक कंपनी आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत त्यामुळे मोठे ब्राँड आता या लहान नावाजलेल्या कंपन्यांना स्वस्तात खरेदी करण्यासाठी स्पर्धेत उतरले आहेत.
फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, फ्लिपकार्ट ही कंपनी डिजिटल आणि वाणिज्य क्षेत्रात ग्राहकांना अधिक अत्याधुनिक सेवा सुविधा देण्यात अग्रेसर आहे. तर क्लिअरट्रिप अनेक ग्राहकांना प्रवास करण्यासाठी उत्तम ट्रॅव्हल कंपनी म्हणून पर्याय आहे. आम्हीव विविध विकसित क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्य़ामुळे या कंपनीच्या माध्यमातून आम्ही अजून एका क्षेत्रात पाउल ठेवले असून आमचे व्यासायिक क्षेत्र मजबूत करण्यात मदत होणार आहे.
फ्लिपकार्ट समूहासह क्लिअरट्रिपची टीम आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर प्रयोगिक क्षेत्रात ग्राहकांना चांगल्या प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मदत करेल. क्लिअरट्रिपचे सीईओ आणि सहसंस्थापक स्टुअर्ट क्राइटन यांनी सांगितले की, क्लिअरट्रिप कंपनी ग्राहकांना प्रवासातील अनुभव सहसोप्पे करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वांचा वापर करण्यात नेहमी पुढे राहिली आहे.
प्लिपकार्ट कंपनी आता ट्रॅव्हल एजन्सी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात एंट्री करणार आहे. यापूर्वी फ्लिपकार्टने मेक माय ट्रिप कंपनीसह पार्टनरिशिपमध्ये ट्रॅव्हल बुकिंगची सुविधा दिली होती.