देश-विदेशपॉलिटीक्स

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला: नारायणपुरात पोलिस कर्मचाऱ्यांच्या बसचा स्फोट;५ सैनिक शहीद,१४ जखमी

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मंगळवारी डीआरजी कर्मचार्‍यांनी भरलेल्या बसमध्ये स्फोट केला. या हल्ल्यात पाच सैनिक ठार झाले, तर १४ जखमी असल्याचे सांगितले जात आहे. या स्फोट दरम्यान, २४ जवान बसमध्ये आहे हे कळताच बॅकअप फोर्स घटनास्थळावर रवाना करण्यात आली. एक ऑपरेशन संपवून सर्व सैनिक परत येत होते. छत्तीसगडचे डीजीपी डीएम अवस्थी यांनी घटनेची पुष्टी केली आहे. बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले की नारायणपुरात नक्षलविरोधी कारवाईनंतर डीआरजी सेना परत येत होती. त्याचवेळी आयईडी(IED) स्फोटात बसच्या चालकासह ५ सैनिक ठार झाले. या घटनेत दोन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत त्यातील एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. आणखी या घटनेत १२ जवान जखमी झाले आहेत जखमी जवानांना हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने रायपूरला रवाना केले आहे.

या अपघातात शहीद झालेल्या जवानांची नावे,
(१)जय लाल उईके, गाव – कसवाही (हेड कॉन्स्टेबल).
(२)करण देहरी, अंतागड, (ड्रायव्हर)

(३)सेवक सलाम, कांकेर –
(४)पवन मंडावी, बहीगाँव
(५) विजय पटेल, नारायणपूर

• घनदाट जंगलाचा फायदा घेऊन नक्षलवाद्यांनी हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील काडेनर धौदाई आणि पल्लन्नर या भागात दाट जंगल आहे. नक्षलवाद्यांनी येथे जाळे रचले आणि बसला लक्ष्य केले आणि आयईडी (IED) फोडला. हे सैनिक मांडोडाला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. शहीद सैनिकांची संख्या वाढण्याची भीती आहे. अतिरिक्त रिइंफोर्समेंट् पार्टी (additional reinforcement party) देखील घटनास्थळी पाठविली गेली आहे.
• छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल नक्षलविरोधी कारवाया अधिक तीव्र करणार आहेत.. …
ते म्हणाले की राज्यात नक्षलवाद्यांचे वर्चस्व कमी होत आहे. आता सरकार नक्षलविरोधी कारवाई तीव्र करणार आहे. त्याचवेळी राज्यपाल अनुसुइया उईके यांनी नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांना सांत्वन देत जखमी जवानांना लवकर ठिक व्हा अशी शुभेच्छा दिल्या. यासह नक्षलविरोधी मोहिमेचे डीजी अशोक जुनेजा म्हणाले की, डीआरजी टीम सकाळी ४:१५ च्या सुमारास सैन्य कारवाई करुन परत येत होती, त्यादरम्यान नक्षलवाद्यांनी तीन आयईडी(IED) स्फोट केले.

•नक्षलवाद्यांनी सहा दिवसांपूर्वी शांतता चर्चेचा प्रस्ताव पाठविला होता

नक्षलवाद्यांनी १७ मार्च रोजी सरकारला शांतता चर्चेचा प्रस्ताव दिला होता. नक्षलवाद्यांनी जनतेच्या हितासाठी छत्तीसगड सरकारशी बोलणी करण्यास तयार असल्याचे सांगून एक निवेदन जारी केले होते. वाटाघाटीसाठी त्यांनी तीन अटी ठेवल्या होत्या. यामध्ये (१)सशस्त्र सेना काढून टाकणे, (२)माओवादी संघटनांवरील निर्बंध हटविणे आणि (३)तुरुंगात नेत्यांची बिनशर्त मुक्तता या गोष्टींचा समावेश आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *