पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास करणार-वर्षा गायकवाड
वार्षिक मूल्यमापन न करता सर्वाना पुढील वर्गात प्रवेश
टीम यंगिस्तान : कोविड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे तसेच सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक मूल्यमापन न करता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.
इयत्ता नववी व दहावीच्या परीक्षेबाबत लवकरच सुधारित निर्णय घेण्यात येईल असेही त्या म्हणाल्या त्यामुळे दहावीच्या २९ एप्रिल २०२१ पासून होणाऱ्या परीक्षा ह्या ऑफलाईन होतील की ऑनलाइन याबाबत संभ्रम आहे.