अहमदाबादमध्ये आज निर्णायक सामना
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज खेळवण्यात येणार आहे. मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. यामुळे दोन्ही संघांना मालिका विजयाची समान संधी आहे. यामुळे पाचवा सामना मालिकेच्या आणि दोन्ही संघांच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे.टीम इंडियाच्या फलंदाजांसमोर मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर या वेगवाग गोलंदाजांचं आव्हान असणार आहे. या दोन्ही गोलंदाजांनी संपूर्ण मालिकेत बोलिंगने प्रभावित केलं आहे. यामुळे या दोघांचा सामना करण्यासाठी भारताला रणनिती करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या बॅटिंगची जबाबदारी ही सलामीवीर रोहित शर्मा तसेच सूर्यकुमार यादव आणि कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर असणार आह. तसेच श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याकडून फटकेबाजीची अपेक्षा असणार आहे. निर्णायक सामन्यात दोन्ही संघात कोणताही बदल होण्याची शक्यता दिसत नाहीये
संभावित संघ
भारत
रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्य कुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर.
इंग्लंड
जॉस बटलर , जेसन रॉय , ओइन मॉर्गन , डेविड मलान , जॉनी बेयरस्टो , बेन स्टोक्स , सैम करण,क्रिस जॉर्डन, आदिल राशिद , मार्क वूड, जोफ्रा आर्चर