इंटरटेनमेंट

इरफान खानला फिल्मफेअर, पुरस्कार स्वीकारताना मुलगा भावूक

दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानने शनिवारी रात्री फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२१ मध्ये वडिलांच्या वतीने दोन पुरस्कार स्वीकारले. इरफान खान यांना मरणोत्तर ‘अंग्रेजी मेडीयम’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन प्राप्त झालेला आयुष्मान खुराना बाबील खानला प्रथमच पुरस्कार सोहळ्यात भेटला आणि त्याचे मनापासून कौतुक केले.

”अजरामर इरफान! हे बांद्रा मध्ये कुठेतरी आहे. पण ते कुठेतरी शांततेत विश्रांती घेत आहे. त्यांचा दुहेरी विजय साजरा करत आहे. ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि आजीवन कर्तृत्व कामगिरी पुरस्कार’, असा आयुष्मान खुराना याने इंस्टाग्रामवर इरफान खानची एक कलाकृती पोस्ट करत कॅपशन केली आहे. आयुष्यमान पुढे म्हणाले, “बाबिल खान एक सुंदर मुलगा आहे.” @babil.I.K यांना हा @filmfare award प्रदान करण्याचा मला बहुमान मिळाला आहे. या सुंदर मुलास पहिल्यांदाच भेटलो. भविष्यात त्याचे काम चांगले होईल असे मला वाटते, आम्ही कलाकार एक अद्वितीय प्रजाती आहोत. आमच्याकडे आपली असुरक्षा, कल्पनाशक्ती आणि सिद्धांत आहेत. आम्ही निरीक्षणे आणि अनुभवांवर अवलंबून आहोत. आम्ही सेल्युलोईडवर किंवा स्टेजवर एक हजार मृत्यू जगतो आणि मरतो. पण त्या कामगिरीची शक्ती आपल्याला अमर बनवते,” आयुष्मानने असा संदेश देतांनी टिपणी केली.

इरफान खान यांचे न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरशी दीर्घकाळ युद्धानंतर एप्रिल २०२० मध्ये निधन झाले. त्यांचा शेवटचा चित्रपट राधिका मदन, करीना कपूर खान, दीपक डोबरियाल अभिनीत ‘अंग्रेजी मेडीयम’ होता.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *