15व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शिवतेज शिरफ़ुले, अमोघ दामले, जीडी मेघना यांचे सनसनाटी विजय
10 मार्च, 2021 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 15व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या शिवतेज शिरफ़ुले, अमोघ दामले यांनी तर, मुलींच्या गटात कर्नाटकाच्या जीडी मेघना यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या शिवतेज शिरफ़ुले याने सातव्या मानांकित हरियाणाच्या तविश पाहवाचा 6-2, 1-6, 6-1 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. महाराष्ट्राच्या चौदाव्या मानांकित अमोघ दामले याने चौथ्या मानांकित तेलंगणाच्या तेजस भाटियावर 6-2, 6-4 असा सनसनाटी विजय मिळवत अनपेक्षित निकाल नोंदवला. आयुश पुजारीने आपला राज्य सहकारी अयान शेट्टीचे आव्हान 6-0, 6-2 असे संपुष्ठात आणले.
मुलींच्या गटात कर्नाटकाच्या बिगरमानांकीत जीडी मेघना हिने सहाव्या मानांकित दिल्लीच्या निलाक्षी लाथेरचा 6-1, 6-1 असा एकतर्फी पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित प्रिशा शिंदे हिने हरियाणाच्या प्राची मलिकचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व(मुख्य ड्रॉ)फेरी
: मुले:
आयुश पुजारी(महाराष्ट्र)वि.वि.अयान शेट्टी(महाराष्ट्र)6-0, 6-2;
अनुज सरडा(उत्तरप्रदेश)वि.वि.हित कांदोरिया(गुजरात)6-7(4), 6-1, 6-2;
ओजस मेहलावट(दिल्ली)(3) वि.वि.फझल अली मीर(तामिळनाडू)7-6(5), 6-4;
शिवतेज शिरफ़ुले(महाराष्ट्र)वि.वि.तविश पाहवा(हरियाणा) (7) 6-2, 1-6, 6-1;
ओम वर्मा(महाराष्ट्र)वि.वि.देव पटेल(गुजरात)6-2, 6-1;
सानिध्य व्दिवेदी(उत्तरप्रदेश)वि.वि.एम दिगंत(कर्नाटक)6-3, 6-2;
अमोघ दामले(महाराष्ट्र)(14) वि.वि.तेजस भाटिया(तेलंगणा)(4) 6-2, 6-4
;आरव चावला(हरियाणा)(2) वि.वि.डायलन रेमिडोज(कर्नाटक) 6-1, 6-2;
मुली:
मेहक कपूर(महाराष्ट्र)वि.वि.सृष्टी किरण(कर्नाटक)6-1, 6-1;
हरिथाश्री वेंकटेश(कर्नाटक)(3)वि.वि.दिया चौधरी(उत्तराखंड)6-1, 6-1;
जीडी मेघना(कर्नाटक)वि.वि.निलाक्षी लाथेर(दिल्ली)(6) 6-1, 6-1;
प्रिशा शिंदे(महाराष्ट्र)(5) वि.वि.प्राची मलिक(हरियाणा)6-3, 6-2;
जान्हवी काजला(राजस्थान)(4) वि.वि.पार्थसारथी मुंढे(महाराष्ट्र)7-5, 6-1;
स्निग्धा कांता(कर्नाटक)(6) वि.वि.शैवी दलाल(गुजरात)6-1, 6-2;
माया राजेश्वरन(तामिळनाडू)(2) वि.वि.आहान 6-2, 6-4.