लॉकडाऊन मध्ये स्किनची ची काळजी कशी घ्याल?
सध्याच्या या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये सर्व जन घरच्या घरी आहे. पार्लर ही बंद आहेत तर अशावेळी आपल्या त्वचेकडे दुर्लक्ष होत आहे.
त्यासाठी आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी कोणकोणते पदार्थ त्वचेसाठी वापरावे व कोणते प्रयोग करावे तर आपण पाहूयात.
१:-भरपूर पाणी प्यावे.सध्या उन्हाळा आहे त्यामुळे घाम आणि सीबम जास्त प्रमाणात शरीराबाहेर टाकला जातो,
दही चेहऱ्याला टी-ट्री, नीम, मिट असे फेसवॉश वापरावे.
२: आंघोळीच्या पाण्यात एक चमचा मीठ टाकून आंघोळ करावी, त्यामुळे थकवा दूर होतो. आणि त्वचा योग्य प्रमाणात ऑक्सिजन ही घेते त्याच्यामुळे तरतरीतपणा वाटतो.
३:- स्किन ला तजेलदार दिसण्यासाठी सी आणि इ व्हिटामिनची गरज असते त्यामुळे रसदार फळांचे सेवन करावेत असेही दही, ताक, लिंबूपाणी प्यावे.
४:-उन्हाळ्यात चेहरा काळवंडून गेलेला असेल तर अशावेळी कच्च्या बटाट्याचा रस काढून त्याचा फेसपॅक प्रमाणे उपयोग करावा, त्यामुळे टॅनिंग उतरण्यास मदत होते.
५: पिकलेला टोमॅटो कुस्करून चेहऱ्यावर दोन मिनिटे मसाज केल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो.
६:-कोणाला जर घामोळ्या चा त्रास असेल तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकून ते पाणी पंधरा मिनिटे उकळून घ्यावे
ते पाणी साध्या पाण्यात मिसळून मग त्या कोमट पाण्याने अंघोळ करावी असे केल्यास घामोळ्यायांचा त्रास कमी होतो.
७:- चेहऱ्यावर जर पिंपल्स काळे डाग पडलेले असतील तर त्या डागांवर तुळशीच्या पानांचा अर्क लावून तो रात्रभर ठेवावा
आणि सकाळी चेहरा फेस वॉश ने धुवावा, असे केल्यास नक्कीच फरक दिसून येतो.
८:- आठवड्यातून एकदाच चेहऱ्याला तीन ते पाच मिनिटे स्क्रबिंग करावे त्यानंतर १० ते १५ मिनिटांनी फेसवॉश लावून नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा
असे केल्यास चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो.
९:-स्वतःहून घरच्या घरी फेस ब्लिचिंग करणे टाळावे केल्यामुळे चेहरा काळा पडू लागतो आणि हा काळे पणा सहजासहजी दूर होत नाही
त्यामुळे वारंवार आणि घरच्या घरी ब्लीच करणे टाळावे.
१०:-फेस पॅक म्हणून चेहऱ्याला चंदन पावडर, निम पावडर, कोरफडीचा रस, पिकलेल्या केळ्यांचा गर,
संत्र्याच्या सालीची पावडर अथवा बटाट्याचा कीस किंवा रस लावू शकतात.
वैष्णवी नाईक