लाइफस्टाइल

अशी घ्या डोळ्यांची काळजी !!

थकलेला माणूस कसा ओळखावा माहित आहे का? तर त्याच्या डोळ्यांवरून! माणसाचे डोळे तो व्यक्ती किती उत्साही आणि किती निरुत्साही आहे ते सांगतात.

डोळे हे इतके संवेदनशील असतात की मानसिक परिणाम असो वा शारीरिक परिणाम असो डोळ्यांवर तो लगेच दिसून येतो.

म्हणूनच आपण जेव्हा खूप थकतो किंवा आपल्या शरीराला विश्रांतीची गरज असते तेव्हा आपले डोळे जड होतात.

हीच स्थिती अजून काही काळ राहिली तर त्याचा थेट डोळ्यावर परिणाम होऊन डोळ्याखाली काळे घेरे (dark circle) येऊ लागतात.

डोळे हे आपल्या सौंदर्यात सुद्धा मोठी भर टाकतात. डोळ्यांवरील थकवा दूर करायचा असेल आणि पुन्हा एकदा फ्रेश व्हायचे असले तर

सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे आपले हात.

तुम्हाला इतकंच करायचं आहे की दोन्ही हातांचे पंजे एकमेकांवर जोरात चोळायचे आहेत. सर्वात प्रथम हळूहळू चोळा आणि मग वेग वाढवा.

जेव्हा हात अशा जोरात चोळल्याने गरम होतील तेव्हा थांबा आणि हे गरम हात ३० सेकंद आपल्या डोळ्यांवर ठेवा.

तुम्ही जर दोन वेळा असे केले तर तुम्हाला अजून चांगला परिणाम दिसून येईल.

हाताचे पंजे एकमेकांवर चोळल्याने एक्युप्रेशर पॉइंट्सवर दबाव निर्माण होतो

आणि रक्ताभिसरण वाढते.

हाताच्या उष्णतेमुळे डोळ्यांवरचा ताण कमी होतो आणि रक्ताभिसरण वाढल्याने शरीर पुन्हा उत्साही होते.

डोळ्यांवरचा थकवा दूर करण्याचा अजून एक सोप्पा उपाय म्हणजे थंड पाण्याने डोळे धुणे होय.

पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की अतिशय जास्त थंड पाण्याने डोळे धुवू नयेत.

शक्य असल्यास फ्रीजचे अर्धे पाणी आणि साधे पाणी एकत्र घ्यावे आणि त्या पाण्याने डोळे धुवावेत.

यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होऊन पुन्हा एकदा तुम्हाला फ्रेश वाटेल.

जगभरात हा पर्याय सर्वाधिक वापरला जातो. कारण यामुळे तुम्हाला कितीही थकवा असला तरी काही क्षणात तो दूर पळून जातो. 

फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेले दुध एका चमच्यात घ्या. त्यात कापसाचा बोळा भिजवा. ३ ते ४ मिनिटे हा बोळा डोळ्यांवर ठेवा आणि

नंतर बोळा बाजूला करून पाण्याने डोळे स्वच्छ धुवा.

यामुळे डोळे आणि संपूर्ण शरीरात उत्साह संचारू लागेल. फ्रीज मधून आईसक्यूब बाहेर काढा. हलकेसे धुवून घ्या.

त्यावर एक कपडा गुंडाळा आणि डोळ्यांना शेक द्या. केवळ २ ते ३ मिनिटेच शेक द्यावा कारण

एवढा वेळ डोळ्यांना ताजेतवाने करण्यास पुरेसा आहे.

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी हा उपाय मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्याचे चांगले परिणाम सुद्धा दिसून येतात.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *