इकॉनॉमीदेश-विदेश

आधी मस्क आता बिटकॉइन ; दोन्ही चे मूल्य घसरले

गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत असणाऱ्या बिटकॉइन चे मूल्य आता गडगडत खाली आले आहे. मागील दोन दिवसात या क्रिप्टो करन्सी ने 58,330 डॉलर प्रति युनिट हा उच्चांक गाठला होता परंतु मंगळवारी हे मूल्य तब्बल 21 टक्‍क्‍यांनी ढासळत 45000 डॉलर प्रतियुनिट झाले आहे.
या उताराचे कारण टेस्ला चे मालक एलन मस्क यांचे ट्विट आहे. या नवीन ट्विटमध्ये त्यांनी “क्रिप्टो करन्सीच्या किमती मध्ये घसरण होऊ शकते” असे विधान केले आहे. या आधी देखील मस्त ने शनिवारी ट्विटरच्या माध्यमातूनच बिटकॉइन आणि इथेरियम सारख्या क्रिप्टो करेंसी महाग झाल्या आहेत असे म्हटले होते.
फेब्रुवारी महिन्यात बिटकॉइन ची किंमत जवळ जवळ 73 टक्क्यांनी वाढली होती. ही वाढ बघत अनेक उद्योजकांनी व कंपन्यांनी यात गुंतवणूक सुरू केली होती. स्वतः एलन मस्क च्या टेस्ला या कंपनीने सुद्धा 1.5 अब्ज डॉलर इतके बिटकॉइन घेतले होते.
परंतु मंगळवारच्या या घसरणीनंतर सर्वच गुंतवणूकदारांना याचा फटका बसणार असे दिसत आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *