आता बिटकॉईनद्वारे विकत घेऊ शकता टेस्लाच्या गाड्या; इलोन मस्कची अधिकृत घोषणा.
इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाने त्यांच्या कार खरेदीसाठी बिटकॉइनला पेमेंट म्हणून स्वीकारण्यास सुरुवात केली आहे, असे सीईओ एलोन मस्क यांनी केलेल्या नवीन ट्वीटनुसार म्हटले आहे. या अधिकृत घोषने द्वारे टेस्ला उत्पादनांच्या बदल्यात बिटकॉइनमध्ये विनिमय स्वीकारण्यास प्रारंभ करणारी पहिली मोठी कंपनी बनत आहे.
आपण आता बिटकॉइनसह टेस्ला खरेदी करू शकता, अशी माहिती इलोन मस्कने ट्विटमध्ये दिली आहे.
मस्क यांनी सांगितले की टेस्लाला दिलेला बिटकॉइन हा बिटकॉइन म्हणूनच कायम ठेवला जाईल,तो चलनात रूपांतरित होणार नाही. ते म्हणाले की, “टेस्ला केवळ अंतर्गत आणि मुक्त सॉफ्टवेअर वापरत आहे आणि चलन बिटकॉइन च्या रूपातच ठेवले जाईल,”
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांनी पुढे सांगितले की ‘पे बाय बिटकॉइन’ क्षमता अमेरिकेच्या बाहेर 2021 च्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल. फेब्रुवारीमध्ये टेस्लाने $ 1.5 अब्ज किमतीचे बिटकॉइन विकत घेतले होते. अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे दाखल केलेल्या तक्रारीत कंपनीने सांगितले की, कार खरेदीसाठी बिटकॉईनचा विकल्प सुरू केल्याबद्दल मस्क ने संगितले की “यामुळे आमच्या रोख रकमेला पर्याय निर्माण होऊन विविधता आणता येईल आणि जास्तीत जास्त परताव्यासाठी अधिक लवचिकता मिळेल”.