मंदीच्या संकटात शेतकऱ्यांनीच राखला देशाचा मान. लॉकडाउन मध्ये एकट्या कृषी क्षेत्रात सकारात्मक वाढ.
देशाची अर्थव्यवस्था टेक्निकल रिसेशन मधून बाहेर येऊन पुन्हा विकासाच्या मार्गावर लागली आहे. या वित्तीय वर्षातल्या तिसऱ्या तिमाहीत जिडीपी मधे ०.४ टक्क्यांची वाढ दिसून आली.
याआधी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लावलेल्या लॉकडाऊन मुळे सतत दोन तिमाहीत अर्थव्यवस्थेत प्रचंड घसरण दिसून आली. परंतु जेव्हा सगळ्या क्षेत्रात तोटा दिसून आला तेव्हा फक्त कृषी क्षेत्रामध्येच वाढ दिसत होती.घसरत्या अर्थव्यवस्थेचा भार शेतकऱ्यांनीच उचलला होता. देशाच्या आर्थिक विकासात ग्रामीण अर्थव्यवस्थेचे खूप मोठे योगदान असल्याचे या महामारीमध्ये पुन्हा सिद्ध झाले.
तीन तिमाहीत किती राहिला शेतीचा विकास दर.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) द्वारे जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, ऑक्टोबर-डिसेंबर २०२० तिमाहीत कृषी क्षेत्राचा विकास दर ३.९ टक्के होता.याआधी एप्रिल- जून आणि जुलै- सप्टेंबर या दोन्ही तिमाहीत कृषी क्षेत्राचा विकास दर ३.४ टक्के होता. कोविड १९ चा कृषी क्षेत्रावर पण परिणाम नक्कीच झाला असला तरी इतर क्षेत्राच्या तुलनेत त्याने स्वतः ला खंबीरपणे उभे ठेवले होते.आता अन्य क्षेत्रात सुद्धा वाढ होत असल्याने कृषी क्षेत्रात चौथ्या आणि पुढील वित्तीय वर्षात उल्लेखनीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.