स्पेशल स्टोरीज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा यांचे अंधश्रद्धेवरील विचार आणि कार्य

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा हे चिकित्सक वृत्तीचे होते संत गाडगेबाबा यांचे अंधश्रद्धेवरील विचार बघायचे तर , त्यांच्या कीर्तनातून ते समोर येत ज्या ठिकाणी बळी दिले जात अशा ठिकाणी गाडगे महाराज जात. लोक तिथे कोंबडी बकरी कापत असत बाजूला त्यांची मुले असत बहुदा मुलांसंदर्भात नवस फेडणे असे. तिथेही उभे राहून गाडगे महाराज लोकांना प्रश्न विचारत –


‘काय करून ऱ्हायला रे ?

”न्हायी जी नवस फेडून राहिलो,

म्या म्हन्ल माह पोरग ठीक झालं की कोंबड कापीन !”

अरे कोंबड कुनाच लेकरू हाय ?”

देवाचच लेकरू हाय !”

आन तूह लेकरू ?”

माह व्ह्य ना जी !”

आन तू कोनाचा रे ?”

मी माह्या बापाचा न जी !”

म्हन्जे शेवटी कोनाचा ?’देवाचं लेकरू !”

मंग तूह लेकरू बी देवाचच न ?’

हो जी !’

अरे तूच त म्हनते कोंबड बी देवाचं लेकरू आणि तूह बी देवाचं लेकरू .

आणि आताच मला सांगत होतास की कोंबड कापलं की देव प्रसन्न होते तूह पोरग बी देवाचं लेकरू है … काप त्याले आणि घे देवाले प्रसन्न करून ! … असं म्हटल्यावर लोकांच्या अंगावर शहारे येत असत आणि त्यांना कोंबड कापायची हिम्मत देखील होत नसे. गाडगे महाराज यांनी कधीही मूर्तिपूजा केली नाही , लोकांना नेहमी अंधश्रद्धेपासून लांब ठेवण्याकरिता प्रवचन दिले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अंधश्रद्धेची उत्पत्ती माहीत होती श्रद्धेतून अंधश्रद्धेची निर्मिती होते हे बाबासाहेब यांना माहीत होते तर ही अंधश्रद्धा धर्मातुन निर्माण होतात असते त्यामुळे ते धर्माचे अतिशय चिकित्सक दृष्टीने अभ्यास केला बाबासाहेब म्हणतात,

“सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार.” बाबासाहेब हे विज्ञानवादी होते. विज्ञान आणि धर्म याविषयी बाबासाहेब म्हणतात,”विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे.”

त्यांच्या दृष्टीने, “धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे,धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.”       

    “मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.” असे बाबासाहेब म्हणत. सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार. बाबासाहेब अंधश्रद्धा न पाळण्याचा उपदेश त्यांच्या अनुयायांना करत अंधश्रद्धेवरील परखड मत मंडतानाते सांगत की, “कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही. त्यामुळे माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.” गाडगेबाबांनी माणसात देव शोधण्याचा संदेश दिला आणि कर्मकांड नाकारलं, तर बाबासाहेब बाबासाहेबांनी देव धर्मावर विषवस न ठेवता स्वतःवर  विश्वास ठेवताना सांगितलं , “आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.” खऱ्या अर्थाने बाबासाहेब आणि संत गाडगे महाराजांच्या विचारांची समजला आज खऱ्या अर्थाने गरज आहे. यांच्या विचारानेच समाजातील अंधश्रद्धा दूर होईल.


 ऋषिकेश खंडाळे – 7391979456

rushikeshkhandale358@gmail.com

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *