एप्रिल-मे महिन्यात उष्ण लहरींचा धोका !
भारतीय हवामान विभागाच्या वतीने मार्च २०२१ या कालावधीत देशात उष्ण लहरींचे प्रमाण वाढणार असल्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान जागतिक हवामान जोखीम निर्देशांक २०२१ नुसार भारत हा धोक्याच्या सातव्या क्रमांकावर आहे.
भारतीय हवामान विभागाच्यावतीने मार्च ते मे २०२१ या कालावधीत देशात उष्ण लहरींचे प्रमाण वाढणार असल्याचा इशारा दिला आहे.
जंगल तोड, शहरीकरण आणि प्रदूषण या घटकामुळे भविष्यात पुन्हा तापमान वाढ आणि उष्ण लहरींचा धोका निर्माण होणार असल्याची भीती पर्यावरण आणि हवामान अभ्यासक
प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे. २०१५ ते २०२० हे वर्ष अत्याधिक उष्ण लहरींचे वर्ष ठरले आहे .
त्याप्रमाणे २०२१ हे वर्ष सुद्धा अति तापमानाचे व उष्ण लहरींचे वर्ष ठरणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटी हवामान विभागाने उन्हाळ्यात वाढणाऱ्या उष्ण लहरींचा इशारा दिला होता.
२ मार्च २०२१ रोजी भारतीय हवामान विभागाच्या इशारा नुसार उन्हाळ्यामध्ये उत्तर पूर्व भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे.
मार्च ते मे महिन्यात ओडिशा झारखंड येथे दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सियस किंवा अत्याधिक असेल.
मार्च ते मे २०२१ मध्ये दिल्ली,चंदीगड,उत्तरप्रदेश,हरियाणा येथे दिवस व रात्रीचे तापमान आणि उष्ण लहरींचे तापमान वाढणार असल्याने तेथील लोकांनी सावध असले पाहिजे असे म्हटले आहे.
यासोबतच हिमाचल प्रदेश कच्छ राजस्थान उत्तराखंड, मेघालय ,अरुणाचल प्रदेश, सिक्किम ,मिझोरम, मणिपूर, बिहार या प्रदेशात देखील तापमान वाढलेले असेल.
दक्षिण भारतात तेलंगणा केरळ तमिळनाडू विदर्भ आणि महाराष्ट्रातील काही प्रदेशात तापमान ०.५ अंश सेल्सिअस अधिक राहील.
मानव व वन्यजीवांचे मृत्यू आणि आर्थिक नुकसानीची सोबतच अत्याधिक तापमान वाढीमुळे आणि उष्ण लहरींमुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होऊन, नैसर्गिक आपत्तीत वाढ होणार आहे.
तापमान वाढीमुळे जमिनीवरील जलसाठे कमी होतील, ध्रुव प्रदेशातील आणि हिमालयातील हिमनद्या वितळून समुद्र पातळीत वाढ होईल, मान्सून वर परिणाम होईल.
मोठी चक्रीवादळे वादळ पाऊस महापूर येथील उष्ण हरित वाढ होईल, जंगलात आगी लागतील वनस्पती व प्राणी यांचा अधिवास नष्ट होईल आणि आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतील,
अशी भीती व्यक्त केली जात आहे.