कोरोना प्रतिबंधक लस घेताना हे नक्की करा!!
कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढता बघून लसीकरण देखील वेगाने सुरू आहे, येत्या काळात अधिकाधिक लोकांना लस उपलब्ध करून दिली जाईल पण ही लस घेण्याआधी तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेणे गरजेचे आहे.
लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्याल :
• लस घ्यायला जाताना ऊपाशी पोटी जाऊ नये शक्यतो नाष्टा अथवा जेवण करून जावे.
• जवळ पाण्याची बाटली ठेवावी कारण उन्हाळा आहे शरीराला पाण्याची गरज असते.
• ज्यांना अस्प्रिन सारखी रक्त पातळ करणारी औषधे आहेत त्यांनी लसी पूर्वी दोन दिवस आधी बंद ठेवावीत इतर आजाराची औषधे वेळेप्रमाणे घेऊ शकता.
लस घेतली असेल तर या गोष्टी जरूर लक्षात ठेवा :
• लसीकरणानंतर थोडासा ताप अंगदुखी ही सामान्य आहे याला घाबरण्याची गरज नाही सगळ्यात आधी आपल्या लसीचा डोस घेतल्या नंतर कामावर जाऊ नका. घरी राहून आराम करण्याचा प्रयत्न करा.
• कोरोनाची लस घेतल्या नंतर त्या आधी किंवा नंतर कोणतीही लस घेऊ नका मेडिकल तज्ञांच्या मते इतर लसींची या कोणाच्या लसी सोबत रिअक्शन होऊ शकते त्यामुळे हे सुरक्षित आहे की नाही याबाबत समजलेले नाही.
• लस घेतल्यानंतर लगेचच वर्कआउट करू नका यामुळे तुमच्या मांस पेशी दुखतील वर्कआऊट केल्यास हे दुखणे अधिक वाढू शकते .
• कारोना लस घेतल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल ते सांभाळून ठेवा येणाऱ्या काळात प्रवास विजासाठी तुम्हाला त्याची गरज पडू शकते तुम्ही हे डिजिटल स्टोरही करू शकता.
लस घेण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया :
• नाव नोंदणीसाठी www.cowin.gov.in या वर लॉगिन करा किंवा cowin app वापरा.
• गेट ओटीपी वर क्लिक करा.
• एस एम एस च्या माध्यमातून आलेला ओटीपी नंबर टाकून व्हेरिफाय करा.
• ओटीपी ची पडताळणी झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर रजिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिनेशन पान येईल.
• वय आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र निवडा.
• जन्म वर्ष लिंग असा सर्व तपशील नोंदणी करताना भरावा.