पॉलिटीक्स

सरकार नेमक दुसऱ्या देशांना आपली लस का देत आहे?

देशात लसीचा तुटवडा असताना केंद्र सरकारने 70 पेक्षा जास्त देशांना 5 कोटी पेक्षा जास्त लस पुरविल्या आहेत. नेमकं सरकारने असा निर्णय का घेतला असेल..? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याची कारणे आपण जाणून घेऊया. 

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानला जगाच्या उद्घरासाठी वापरण्याचा संकल्प ठेवला होता. परंतु त्यानंतरच्या सर्वच पंतप्रधानांनी याच्याकडे एक जागतिक पातळीवरची सॉफ्ट-पावर म्हणून पाहिलं. उदा. कमी किमतीत गरीब देशांचे उपग्रह अंतराळात सोडणे असो किंवा कोरोनाची लस गरीब व विकसनशील देशांना देण्याचा निर्णय असो. आपण जगाच्या 62% लस निर्माण करतो, तर जगात औषधी उत्पादनासाठी भारत दुसऱ्या स्थानी आहे. जगाच्या 20% वैद्यकीय क्षेत्रातील उत्पादन आपण करतो. भारताचे शेजारी राष्ट्र अफगाणिस्तान, बांगलादेश, भुटान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव पाकिस्तान सोडून सर्व शेजारी देशांना भारताने आपली लस पुरविली आहे. फक्त एवढेच नाही तर, मंगोलिया,पॅसिफिक द्वीपावरील देश, कॅरेबियन देश यासोबतच आफ्रिका खंडातील गरीब व विकसनशील देशांना सुद्धा भारताने लस पुरविली आहे. याचं कारण मागच्या काही काळामध्ये आपल्या शेजारील देश बांगलादेश, नेपाळ, मालदीव अश्या देशांसोबत काही वाद वाढले होते. आता आपला देश या सर्व देशांना आपली लस देऊन मदत करत आहे.यामुळे भारताची विश्वस्तरावरची प्रतिमा दिवसेंदिवस चांगली होत चालली आहे.     केंद्र सरकार ज्या गरीब व विकसनशील देशांना लस पाठवत आहे त्या लसीचे प्रमाण ही प्रत्येक देशाप्रमाणे कमी-कमी आहे, म्हणजे आपण ज्या लस पाठवत आहोत त्या लशीला त्या देशातील हेल्थ केअर वर्कर,स्वच्छता कर्मचारी ,पोलीसांना ती लस दिली जात आहे अर्थातच जे फ्रन्टलाइन वर काम करणाऱ्या कोरोना योद्यांना लस दिली जात आहे. भारताच्या माध्यमातून त्या देशांची आरोग्य व्यवस्था, त्या देशातील कारोनाशी लढण्यासाठी असलेली यंत्रणा आपण मजबूत करत आहोत.आपण ज्या प्रमाणात लस पाठवत आहोत ती लस त्या देशातील संपूर्ण नागरिकांना भेटत नसून त्या देशातील महत्त्वाच्या घटकाला भेटते आहे. जेणेकरून त्यामुळे त्या देशाला कोरोनाशी लढण्यासाठी बळ मिळेल.

नेमकं या देशांना लस देऊन भारत काय साध्य करणार..? 
जगाचं राजकारण सुध्दा काहीस आपण राहत असलेल्या नागरी वस्ती सारख आहे. आपला विरोधक देश चीन हा वेळोवेळी आपल्या शेजारच्या देशांना कर्ज देऊन, त्यांना कर्जबाजारी करून आपल्या देशाचे ज्या देशांसोबत चांगले संबंध आहेत. त्या देशांवर कर्जाच्या व्याजाचा दबाव देऊन संयुक्त राष्ट्र समिती मध्ये आपल्या विरुद्ध उभा करत आहे. आपण चीन विरुद्ध आर्थिक स्पर्धा केल्यास आपल्या टिकाव लागण्याच्या शक्यता कमी आहेत. परंतु आपल्या देशाला मिळालेली सॉफ्ट-पावर आहे. ही सॉफ्ट पॉवर म्हणजे आपल्या देशामध्ये बनवलेली लस. जी आपण दुसऱ्या गरीब आणि विकसनशील देशांना देऊन त्यांची मदत करत आहोत. कदाचित ह्याचा फायदा आपल्याला भविष्यात संयुक्तराष्ट्र समितीच्या सुरुक्षासमिती मध्ये (permanent member) म्हणून मिळेल.
आपण केलेल्या मदतीची जाणीव या देशांना भविष्यात राहील का..? चीन आणि रशिया सोबतच काही पाश्चिमात्य देशातील कंपन्यांनी उदाहरणार्थ जॉन्सन एंड जॉन्सन, फायजर बायोटेक, मॉडेरणाने बनविलेल्या लशी अत्यंत महागड्या आहेत. परंतु भारताने बनवलेली सर्वात सुरक्षित व स्वस्त आहे. काही दिवसांपूर्वी ब्राझीलच्या लोकांचा सर्वे करण्यात आला त्या सर्व्हे मध्ये त्यांना चीनची सिनो व्याक ही लस कशी वाटते याच सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात ब्राझीलच्या 50 टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी ती असुरक्षित वाटत असल्याचं नमूद केलं. त्यानंतर ब्राझीलचे पंतप्रधान बोलसेनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला आणि भारताने तातडीने आपली लस ब्राझीलला पाठविली. त्यानंतर बोलसेनारो ह्यांनी ट्विटरवर हनुमान डोंगर उचलून ब्राझीलला नेत असल्याचे चित्र अपलोड करून भारताचे धन्यवाद मानले. म्हणजे भारताने ब्राझीलला संजीवनी बुटी दिली आहे आणि हीच संजीवनी बुटी आज भारत आज संपूर्ण जगाला देत आहे.भारत हा फक्त गरीब व विकसनशील देशांनाच लस देत नाहीये तर ब्रिटेनने सुद्धा आपल्याकडे एक करोड लसींची मागणी केली आहे. सोबतच कॅनडाने सुद्धा 20 लाख लस मागविल्या आहेत. आणि काही दिवसातच कॅनडाला 5 लाख लस पुरविण्यात आल्या. त्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान यांनी ट्विट करून लिहिलं की जर कोरोनाच्या संकटातून जग बाहेर निघालं तर भारताच्या आरोग्यसेवेच त्यात सर्वात महत्त्वाच योगदान असेल. तसेच त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. भारत भलेही त्या देशांमध्ये एखादा पुल किंवा इमारत बांधून देत नसेल किंवा त्यांना चीन प्रमाणे लाखो करोडो रुपयांचे कर्ज देत नसेल परंतु भारत या सर्वांना जीवनदान देत आहे. आणि ह्या जगात आयुष्यापेक्षा काही जास्त आहे का ? असं काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचं म्हणणं आहे.एकूणच जर आपण पाहिलं तर आपण दुसऱ्या देशांना जी लस देत आहोत त्यामुळे आपल्या देशाला पुढे चालुन वेगवेगळ्या प्रकारे मदत होईल. युनायटेड नेशन मध्ये असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका चीन रशिया या देशांना सुपरपॉवर म्हणणाऱ्या देशांसमोर भारत हा एक नवीन आदर्श आहे कारण, जग संकटात असताना भारत जगाला मदत करत होता. हाच विश्वास भारताला प्रस्थापित करायचा होता आणि हा विश्वास लसीच्या मदतीच्या माध्यमातून निर्माण होईल. “वसुदेव कुटुंबकम” हे ब्रीद समोर ठेऊन लसीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला आपलं कुटुंब मानत जगाला मदत केल्यामुळे आपली एक चांगली प्रतिमा तयार होते आहे, आणि आपण जगाला कोरोनाशी लढण्यासाठी तयार करत आहोत.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *