लाइफस्टाइल

लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे गरजेचे, वाचा कारण

सध्या जगभरात लसीकरण करणे सुरू झाले आहे. लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात, मग त्यानंतरही मास्क वापरण्याचे बंधन का घातले जाते? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. खालील माहितीतून त्याचे उत्तर मिळण्यास तुम्हाला मदत होईल…
कोरोनाचा सामना करण्यासाठी लस मदत करते असे निष्कर्षातून सिद्ध झाले आहे. परंतु लस घेतल्याने कोरोनाचा संसर्ग होणे पूर्णपणे बंद होईल का..हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होणाऱ्या अनेक व्यक्ती आढळून आल्या आहेत. त्यामुळे सध्या इतरही असे अनेक लोक असतील ज्यांना लस घेतल्यानंतरही संसर्ग झाला असेल, परंतु लसीमुळे त्यांच्यावर कोरोनाचा प्रभाव झाला नसेल. त्यामुळे लस घेतल्यानंतर मास्कचा वापर करण्याची आवश्यकता नाही असे अनेकांना वाटू शकते. परंतु मास्क वापरणे बंधनकारक आहे, कारण लसीकरणामुळे त्या व्यक्तीवर कोरोनाचा प्रभाव होणार नाही पण ती व्यक्ती इतरांना बाधित करू शकते. 
नाकाद्वारे संसर्ग पसरण्याची शक्यता..बहुतांश विषाणूंचा संसर्ग नाकात कैकपटीने वाढतो. त्यानंतर एम्यून सिस्टीम ऑंटीबॉडीज तयार करते. अँटीबॉडी सामान्यतः म्युकोसाला लक्षात घेऊन तयार होते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला पुन्हा संसर्ग झाला तर अँटीबॉडीज आणि इम्यून सेल्स तो ओळखून नाकातच नष्ट करतात. कोरोनाची लस ही स्नायूंमध्ये दिली जाते. त्यामुळे अँटीबॉडीज रक्तवाहिन्यांद्वारे म्युकोसा पर्यंत पोहोचत आहे. परंतु ती नाकाला कितपत सुरक्षित ठेवते हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला कोरोना होणार नाही परंतु ती इतरांना बाधित करू शकते. असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.  त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क घालणे गरजेचे आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *