२४ तासांत ५१९ रुग्णांचा मृत्यू; ६२,०९७ नवे करोनाबाधित!
राज्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ५१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. त्यासोबतच, राज्यात दिवसभरात एकूण ६२ हजार ९७ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आजपर्यंत राज्यात सापडलेल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा ३९ लाख ६० हजार ३५९ इतका झाला आहे. त्यासोबतच एकूण मृतांचा आकडा देखील ६१ हजार ३४३ इतका झाला आहे.राज्याचा मृत्यूदर हा 1.55 तर देशाचा मृत्यूदर 1.18 झाला आहे. राज्यात आज दिवसभरात ५४ हजार २२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, दुसरीकडे नवे करोनाबाधित सातत्याने वाढत असल्यामुळे राज्याचा रिकव्हरी आलेख सातत्याने खाली आल्याचे गेल्या महिन्याभरात दिसून आलं आहे. सध्या राज्यात एकूण ६ लाख ८३ हजार ८५६ ॲक्टिव्ह करोना रुग्ण आहेत.