जाणुन घ्या महाराष्ट्रात कोरोना अपडेट्स!
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत असुन महाराष्ट्रात रविवारी १६ हजार ६२० रुग्णांची नोंद झालेलीे असल्याचे मत
आरोग्यमंत्र्यांनी मांडले आहे. मागील २४ तासात ५० हजार रुग्णांचा मृत्यू झाला व रविवारी दिवसभरात ८ हजार ८६१ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आले आहे.
यामध्ये महाराष्ट्रात हॉटस्पॉट ठरलेल्या निवडक जिल्ह्यांनी लक्ष वेधले आहे.याबद्दल घेवुया सविस्तर आढावा :
१)नागपूर
नागपुरात रविवारी दैनंदिन रुग्ण संख्येत पुन्हा उच्चांक गाठला रविवारी १४ मार्च रोजी ४९२४ नवे रुग्ण आढळून आले तर ते ३३ रुग्णांचा जीव गेला आहे.
कोरूना चा वाढता संसर्ग पाहता नागपूर सोमवार १५ मार्च ३१ मार्च दरम्यान नागपूर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कडक लोक डाऊन लागू करण्यात आला आहे.
यादरम्यान पूर्णतः संचारबंदी लागू राहील. यासाठी जिल्हा व मनपा प्रशासन सह पोलीस विभागही सज्ज झाला आहे.
लॉकडॉऊनचे उल्लंघन करणार्या आणि मास्क न घालता फिरणारे आढळून आले तर त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करतील.
२) नाशिक
नाशिक मध्ये दिनांक रविवारी १४ मार्च ला १३५६ नव्या रुग्णांची नोंद झालेली दिसून येत आहे तर ५२३ रुग्ण बरे झाले
असून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे घटना व्यवस्थापक तथा जिल्हा-परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोडे यांनी
प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर कार्यान्वित केले असून २००० घाटी ही आरक्षित केल्या आहेत.
३)अमरावती
रविवारी अमरावती जिल्ह्यात २ हजार ७३० कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये ३८५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर सहा जणांचा मृत्यू झाला.
४)औरंगाबादेत
एकाच दिवशी प्रथमच १०२३ नवीन कोराणा रुग्ण सापडले असून अकरा कोरूना बाधित रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला आहे.
५)सोलापुर
जिल्हात १९१ नवीन रुग्ण आढळुन आले असुन ५३ जण बरे झाले तर दोघांचा मृत्यू झाला.
६) पुणे
शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात १७४० रुग्णांची वाढ झाली. तर बरे झालेल्या ८५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
विविध रुग्णालयातील ३५५ रुग्ण अत्यवस्त असून दिवसभरात एकूण १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
७) अकोला
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून रविवारी १४ मार्च रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४०२ एवढा झाला आहे तर ५३७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
८) जळगाव
रविवारी शहरात पाच महिन्यांच्या कोरोना रुग्ण संख्येचा उच्चांक नोंदविण्यात आला. ३७६ नवे रुग्ण समोर आले असून तीन बाधितांच्या मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
या आधी ५ ऑक्टोंबर रोजी ३६९ रुग्णांची एकाच दिवसात नोंद करण्यात आली होती शहरातील बाधितांचे प्रमाण हे थेट ४० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची चित्र आहे.,
९) जालना
जिल्ह्यातील कोरूना चे तापमान कायम असून रविवारी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार तीनशे आठ जणांना कोरोना ची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे.
जालना शहरांमध्ये २२२ रुग्ण आढळून आले आहे.
१०) यवतमाळ
दिवसेंदिवस करूनच हा जीवघेणा खेळ अधिक क्रूर होत चाललेला आहे. रविवारी जिल्ह्यात तब्बल पाच जणांचा कोरोणामुळे मृत्यू झाला असून
दिवसभरात आणखीन ४७० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण बळींची संख्या ५०६ इतकी झाली असून आत्तापर्यंतच्या बाधितांच्या आकडा
२१ हजार ७३५ इतका वाढला आहे. सध्या २७३६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.