पॉलिटीक्समहाराष्ट्र

एसबीआय संशोधन संस्थेचा खळबळजनक दावा: भारतात कोरोनाची दुसरी लाट

फेब्रुवारीपासून कोरोनाची प्रकरणे भारतात सातत्याने वाढत आहेत. तेव्हापासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची भीती सर्वांना त्रास देऊ लागली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) संशोधन संस्थेच्या अहवालात असा दावा केला गेला आहे, की कोरोनाची दुसरी लाट सुमारे १०० दिवस चालेल. जर त्याची सुरुवात १५ फेब्रुवारीपासून मानली, तर त्याचा प्रभाव मेपर्यंत राहिल. जर आपण २३ मार्चच्या प्रवृत्तीचा (TREND)आधार म्हणून विचार केला, तर देशातील दुसर्‍या लाटेत २५ लाखाहून अधिक लोकांना संसर्ग होऊ शकतो. एसबीआयच्या(SBI) २८ पानांच्या अहवालात असे म्हटले आहे, की स्थानिक पातळीवर लॉकडाऊनचा काही परिणाम होणार नाही. म्हणूनच, कोरोनाविरूद्ध युद्ध जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे हा एकमेव मार्ग आहे. जर आपण आतापासून याची गणना केली, तर ते एप्रिलच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत शिगेला(PEAK) येऊ शकेल. यापूर्वी मागील वर्षी सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात कोरोना पीक देशात होता. त्यावेळी दररोज ९० हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली होती.

पुढील महिन्यापासून दिसणार लॉकडाऊनचा परिणाम

आर्थिक संकेतांना केंद्रस्थानी ठेवत मागील आठड्यापासूनच निर्देशांकात सतत घसरण दिसून येत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. काही राज्यात आंशिक किंवा पूर्णतः लावलेल्या लॉकडाऊनचा परिणाम पुढील महिन्यापासून दिसणार आहे.

लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज

या अहवालात राज्यातील लसीकरण प्रक्रियेस वेग देण्याची आवश्यकता असल्याचेही नमूद केले आहे. सध्याच्या परिस्थितीत, लसीकरणाचा वेग दररोज ३४ लाखांवरून ४० ते ४५ लाखांपर्यंत वाढविला गेला, तर ३ ते ४ महिन्यांत ४५ वर्षांपर्यंत आणि त्यावरील संपूर्ण व्यक्तींना लसीकरण करता येईल.

मास्क आणि लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे:

आयसीएमआर(ICMR) आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी देशात गेल्या 5 महिन्यांत सर्वाधिक ५३ हजार ४७६ नवीन रुग्ण आढळले. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशातील १८ राज्यांत कोरोनाचा डबल म्युटेंट वेरीऐशन (DOUBLE MUTENT VARITION) सापडला आहे. आयसीएमआरचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव म्हणाले, की कोरोनाची दुसरी लाट वेळेच्या अगोदर आली आहे. म्हणूनच आपण सर्वांनी जागरूक राहण्याची गरज आहे. अधिकाधिक चाचण्या केल्या जाव्यात, मास्क लावणे आवश्यक आहे. तसेच, लसीकरण लवकरात लवकर पूर्ण केले पाहिजे.

आतापर्यंत १.१७ कोटी सक्रंमित

देशामध्ये आतापर्यंत १ करोड १७ लाख ८७ हजार १३ लोक या महामारीने सक्रंमित झाले आहेत. यापैकी १ कोटी १२ लाख २९ हजार ५९१ जण बरे झाले आहेत, तर १.६० लाख रुग्णांचा बळी गेला आहे. हे आकडे covid19india.Org या संकेतस्थळावरून घेतले आहेत.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *