कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत काय साम्य? कशी घ्यायची काळजी?
कोरोनाच्या पहिले लाटेत सप्टेंबर २०२० मध्ये रुग्णांच्या आकड्यांनी उच्चांक गाठलेला होता तेव्हा एकाच दिवशी २४ हजार ८९६ रुग्ण आढळून आले होते. पण आता १८ मार्चला आकड्यांनी हा उच्चांक मोडीत काढला आहे. डिसेंबर जानेवारी मध्ये महाराष्ट्रातील आकडे बरेच कमी झाले होते. कोरोनाची लाट ओसरली असं दिसून येत होते पण फेब्रुवारी २०२१ च्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढायला लागले आहेत. आणि सात ते अकरा मार्च दरम्यान केंद्रीय आरोग्य पथकाने राज्याचा दौरा केला आणि तिथल्या आढावा बैठकीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं शिक्कामोर्तब झाले. पण कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटे पेक्षा काही प्रमाणात वेगळी आहे. पहिल्या लाटेमध्ये इतके जास्त कोरोना रुग्णांचे आकडे आलेले नाहीत पण दुसऱ्या लाटेमध्ये एवढे जास्त आकडे का वाढत आहेत?
बघुयात कोरोनाची पहिली लाट व कोरोनाची दुसरी लाट यामध्ये काय साम्य :
करोनाची पहिली लाट ही स्थिर होण्यापूर्वी किंवा कमी होण्यापूर्वी हि दुसरी लाट आली आहे. पण नवीन लाट येथील जवळपास ९० टक्के लोक हे लक्षण नसलेले आढळून आले. घरी विलगीकरण करून या रुग्णांवर उपचार करणे शक्य होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर पहिला लाटे पेक्षा कमी दिसून येत आहे. तरीही रोज ५० ते ७० मृत्यूची नोंद होत आहे. कमी मृत्यू दर हेच नवीन लाटेचा वैशिष्ट्य आहे. तुमचं आणि कुटुंबियांचं लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
वातावरणात दिवसेंदिवस बदल होत आहे त्यामुळे सर्दी खोकला किंवा ताप येणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे पण सध्या कोरोना महामारीचा कहर सुरू असल्यामुळे लोकांना आजारी पडण्याची सुद्धा भीती वाटत आहे. तुम्हाला ही वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकला किंवा ताप अशी लक्षणे दिसून आल्यास घाबरण्यासारखे काहीही नाही. काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही आजारापासून दूर राहू शकता.अस्वस्थ वाटल्यास घरी राहणे हेच योग्य. जर आपल्यास ताप खोकला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित वैद्यकीय उपचार किंवा सल्ला घ्यावा.
कोरोना पासून बचाव कसा करावा :
१) लसीकरण.तुमचं आणि कुटुंबियांचं लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.२) हात सतत धुणं.कोरोनाव्हायरस पासून बचावासाठी हात धुण सॅनिटायझर वापरणे हे सगळ्यात सोपा उपाय आहे WHO तील तज्ञांनी सुद्धा अनेकदा कोरोनाला दूर ठेवण्यासाठी २० सेकंदापर्यंत हात धुण्याचा सल्ला दिलेला आहे. तुमच्याकडे पाणी आणि साबण उपलब्ध असेल तर हात धूत राहा.
३) तोंडाला सतत हात लावू नका.कोरोनाव्हायरसच्या इन्फेक्शन पासून लांब राहायचं असेल तर सतत तोंडाला हात लावू नका. संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर तुम्ही तोंडाला स्पर्श केला तर व्हायरसचा प्रवेश शरीरात होऊ शकतो. यासाठी डोळे नागोठणा स्पर्श करणे टाळावे.
४) प्रवास करताना सावध राहा.प्रवास करत असताना सावध राहायला हवं कारण तुमच्या मागे किंवा पुढे बसलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली असू शकते त्यामुळे मास्कने चेहेरा दाबण्याचा प्रयत्न करा किंवा खोकत असलेल्या व्यक्ती पासून लांब रहा.
५) रोग प्रतिकार शक्ती वाढवा.कोरोना सारख्या आजाराला हरवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती हि महत्त्वाचा उपाय आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रोटिन्स शरीराला मिळणे आवश्यक असते. त्यामध्ये कॅल्शियम जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, फॉलिक ॲसिड, जीवनसत्व इ, लोह, ह्या अशा पोषक तत्त्वांची गरज असत. ही तत्वे डाळीतून कडधान्यतून हिरव्या पालेभाज्यातून शरीराला मिळते यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
६) व्यायाम करणे.नियमित व्यायाम केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत मिळते. भुजंगासन व सेतुबंधासन हे दोन व्यायाम केल्याने डोक्याचा ताण कमी होतो व फुफ्फुसांची क्षमता वाढते. भुजंगासन केल्याने आत्मविश्वास वाढतो नैराश्य दूर होते व त्यांची क्षमता वाढते व थकवा येत नाही. सेतुबंधासनस सणामुळे उच्च रक्तदाब दमा हे असं फार उपयोगी ठरते.
सध्या या शहरांत बंदी :
नाशिक – नाशिक शहरात रविवार शनिवार दोन दिवस बाजारपेठ बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. नाशिक शहरात कोरोना केसेस वाढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ओझर विमानतळावर त्याबद्दल बैठक घेतली.
पुणे – पुण्यामध्ये कोरोनाचा आकडा वाढल्यामुळे लॉकडाऊन लागले आहे. बाजार सेटिंग मध्ये महापालिकेसह पोलिसांची गोष्ट राहणार आहे. मास्कचा वापर केला नाही तर कारवाई करण्यात येणार आहे.
नागपूर – नागपूर मध्ये ३१ मार्च पर्यंत लॉकडाउन राहील अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
औरंगाबाद – औरंगाबादमध्ये ११ मार्च पासून ४ एप्रिल पर्यंत शनिवार व रविवार दोन दिवस पूर्णपणे लॉकडाउन राहणार आहे. सर्व व्यवहार दोन दिवस बंद राहतील. जीवनावश्यक वस्तूंसाठी मुभा दिली जाईल.
वाशिम – वाशिमच्या शेलुबाजार येथे पाच दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागला आहे. गावात ४८ कोरोना रुग्ण आढळल्याने गाव चारी बाजूने सील करून लोकांना बाहेर फिरण्यास बंदी घातली आहे. याव्यतिरिक्त धुळे नंदुरबार पनवेलमध्ये लॉकडाउन आहे.