इकॉनॉमी

कोविड -१९ मुळे ‘१० हजार’ कंपन्यांना टाळेबंदी

कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) दिलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील दहा हजार ११३ कंपन्या बंद झाल्यात. कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वइच्छेने बंद झालेल्या कंपन्यांची ही आकेडवारी असल्याचं केंद्राने स्पष्ट केलं आहे. यापैकी सर्वाधिक कंपन्या बंद झालेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद होण्यामागील सर्वात मोठं कारण हे देशात लागू करण्यात आलेल लॉकडाउन आहे . लॉकडाउनमुळे देशातील आर्थिक व्यवहारांना खूप मोठा फटका बसला. त्यामुळेच अनेक कंपन्या बंद करण्यात आल्या.

कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे असणाऱ्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या आकडेवारीत  चालू आर्थिक वर्षामध्ये कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २४८ (२) अंतर्गत एकूण १० हजार ११३ कंपन्यांना बंद करण्यात आल्या आहेत. कलम २४८ (२) चा अर्थ या कंपन्यांविरोधात सरकारने कोणतीही दंडात्मक कारवाई करुन त्या बंद न करता कंपन्यांनी स्वत:हून आपले उद्योगधंदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यातच सर्वात जास्त दिल्लीतील तर सर्वात कमी पश्चिम बंगाल येथील टाळेबंदी झालेल्या कंपन्यात याठिकाणच्या कंपन्यांचा समावेश आहे. या आकडेवारीसंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *