इंटरटेनमेंटमहाराष्ट्रलाइफस्टाइल

कोरोनाच्या प्रभावामुळे व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी सलूनमध्ये चिकन तर कापड दुकानात भाजीपाला!

कोरोनाच्या  वाढत्या प्रभावामुळे आणि लॉकडाउनमुळे शासनाने दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. या नियमानुसार वाळूज येथील सर्वच व्यापारी आपापल्या दुकानातून अत्यावश्यक  सेवा देणार आहे. त्यामुळे सलूनच्या दुकानात चिकन मिळेल व कापड दुकानात भाजीपाला उपलब्ध होईल, आणि हॉटेलमध्ये फळफळावळे खरेदी करता येतील त्यासाठी दुकानदाराने दुकानाचे फलकसुद्धा बदल आहे.

  कोरोनामुळे सर्वत्र आर्थिक परिस्थिती विस्कटलेली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी लोक लोक तुपाशी तर काही लोक उपाशी अशी परिस्थिती सध्या व्यापारी लोकाचे झाले आहे त्यामुळे यावर तोडगा काढता शासन नियम न मोडता  येथील व्यापाऱ्यांनी एक पर्याय शोधून काढला आहे. याबाबत नुकताच  व्यापारी याबाबत नुकताच व्यापारी संघटनेची बैठक झाली या अनेकांनी आपली मते मांडले होते .

अत्यावश्यक वस्तू च्या नावाखाली अनेक जण नियम मोडण्याचे प्रकार करीत असल्याचे काहींनी सांगितले त्यामुळे व्यापारी संघटनेने बैठक घेऊन सुरु असलेल्या आपल्या दुकानातच अत्यावश्यक सेवा साहित्य विक्री करण्याचे ठरवले. त्यामुळे आता वाळूज येथील सर्वच दुकानदाराने अत्यावश्यक सेवा सुरू करायचे ठरवले आहे . बैठकीला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण अग्रवाल, महेश गंगवाल बाबासाहेब गोराडे, अविनाश गायकवाड, संजय खोचे, पंकज शिगरे, कृष्णा काथार, सोहेल पठाण, संतोष जाधव, सचिन वडगावकर , बालाजी पाटील, शेख हमीद , रवींद्र आढे, ज्ञानेश्वर गोरेगावकर,  आकाश गोरे , आदींची  उपस्थिती होते .

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *