कोरोनाकाळ आणि मासिक पाळी
कोरोना महमारीचा काळ सुरू झाला , पहिल्या 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आणि टप्याटप्याने लॉकडाउनची वेळ वाढत गेली . शाळा कॉलेजलाही सुट्ट्या जाहीर झाल्यामुळे सगळे विद्यार्थी आपापल्या गावी आपापल्या घरी परतले.
सुरुवातीला परिस्थिती इतकी चिघळत जाईल याचा अंदाज नव्हता . हळू हळू लॉकडाऊनचा काळ सलग वाढत असल्याने तेच घरात राहणे , स्वतःची काळजी घेणे , रिकाम्यावेळेत रोजच्या आयुष्यात विसरून गेलेले जुने छंद जोपासणे असा दिनक्रम सुरू झाला .
मार्च महिन्यात माझी मासिक पाळी नियमित आली तेव्हा सगळे नेहमी सारखेच त्रास, घाम फुटणे , रक्तस्त्राव जास्त होणे , ओटीपोट दुखणे कसे तरी गेले ते पाच दिवस . एप्रिल महिना आला डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, पोलीस इत्यादी सगळे आपली कर्तव्ये बजावण्यात गर्क होते आणि ही सगळी परिस्थिती आपण सातत्याने पाहत होतो, कोरोनाने जणू संपूर्ण माध्यमांवर अधिराज्यच गाजवले होते .परत माझ्या मासिक पाळीचा दिवस आला, परंतु ही मासिक पाळी माझ्यासाठी जरा वेगळी होती मला होत असलेल्या वेदना विसरायला लावणारी होती. मला रक्तस्त्राव सुरू झाला नेहमीचाच सगळा त्रासही सुरू झाला. ५ मिनिटे ओटीपोट कवटाळून बसल्यानंतर मनात त्या महिलांचे चित्र उभे झाले ज्या या कोरोना काळात पीपीई किट्स घालून आपले कर्तव्य बजावत होत्या.
पीपीई किट्स आणि मासिक पाळी –
कोरोना काळात आपल्या रोजच्या जगण्यात आलेले कॉरंटाइन , पीपीई किट्स , मास्क , सॅनिटाइजर हे शब्द आहेत . जितक्या नाईलाजाने हे शब्द आपण दैनंदिन जीवनात वापरतोय तितक्याच नाईलाजेने कोविडयोद्धा महिलांनी पीपीई किट्स वापरलेल्या आहेत . त्यातल्या त्यात मासिक पाळी .
आता माझा शोध सुरु झाला की कोणती माध्यमे या विषयावर बोलत आहेत का ? आणि मे महिन्यात मला डॉ . कामना कक्कर यांनी शेअर केलेला त्यांचा पीपीई किट्स आणि मासिक पाळी वरचा अनुभव मला वाचायला मिळाला . त्यांचा अनुभव सांगताना त्या म्हणतात की ” ७ मे ला माझा कोविड वॉर्डात काम करण्याचा पहिलाच दिवस होता ,त्या नादात माझी मासिक पाळी येण्याची तारीख आहे हेच मी विसरले.पण मला पाठीत आणि पोटात दुखायला लागले होते. माझा कोरोना वॉर्डात ड्युटीचा पहिलाच दिवस असल्याने मी लक्ष दिले नाही. कोरोना वॉर्डात जाण्यासाठी पीपीई किट घालून तयार व्हायला ४५ मिनिटे आणि ड्युटी संपल्यानंतर पीपीई किट काढायला ४५ मिनिटे लागतात. मी पीपीई किट घालून वॉर्डात गेले.सोबतीला एक नर्स होती. पीपीई किट पहिल्यांदा घातली असल्यामुळे साहजिकच थोडे अवघडल्यासारखे वाटत होते. ४० डिग्री सेल्सिअस तापमानात पीपीई किटच्या ६ लेयर्स अंगावर असल्याने अस्वस्थ वाटत होते . कोरोना वॉर्डात २ तास झाल्यानंतर मला पायांच्यामध्ये गरमपणा जाणवू लागला आणि मला लगेच काळले की मला पिरेड्स आलेत. त्या दिवशी मी या साठी तयार नव्हते. कोविड वॉर्डात जात असताना कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून पूर्ण रिकाम्या हाताने जावे लागते, त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन सोबत नेणे अशक्यच होते. त्यादिवशी मी माझ्या चॉईसने ड्युटीच्या पूर्ण वेळात सॅनिटरी पॅड न घेताच पीपीईकिट मध्येच रहिले . माझ्या जागेवर दुसऱ्या डॉक्टर ला शिफ्ट हँडओव्हर करून सॅनिटरी नॅपकिनसाठी जाणे परवडण्यासारखे नव्हते कारण कोरोना काळात डॉक्टर्ससाठी अत्यावश्यक असलेल्या पीपीई किट्स वाया घालवणे मला बरोबर वाटत नव्हते. माझी ६ तासाची शिफ्ट संपली . त्यानंतर मी अंघोळ करून फ्रेश झाले . मी हा अनुभव माझ्या मैत्रिणींना सांगितला तेव्हा त्या मला” ट्रू कोरोना वोरिअर ” असा म्हणाल्या पण त्यात इतके कौतुक करण्यासारखे मला काहीही झाले वाटले नाही . याउलट ज्या महिलांची प्रसूती रस्त्यावरती होते त्या जास्त खऱ्या योद्धा आहेत असे मला वाटते . ”
परंतू खरोखर या काळात कर्तव्य बजावणाऱ्या महिलांनी खूप त्रास सहन केलेत . देशाप्रती कर्तव्य बजावता बजावता त्या स्वतः ची काळजी घ्यायला त्या विसरल्या होत्या असे म्हणायला हरकत नाही.
कोरोनातून मुक्त झाल्यानंतरची मासिक पाळी :
ज्या महिला कोरोनातून मुक्त झाल्या त्यानंतर महिलांचा मासिक पाळी मध्ये त्रास वाढला आहे . करण, कोरोनानंतर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झलेली आहे त्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते महिलांनी स्वतःची काळजी घयायला हवी योग्य आहार व्यायाम गरजेचा आहे शरीराला वेळोवेळी रिलॅक्स केले पाहिजे.
झोप वेळेवर हवी
जास्तवेळ बसून काम करू नये कामातून मध्येच ब्रेक घ्यावा
कोविड 19 नंतर शरीराची झालेली झीझ हळूहळू भरुन येत असते त्यामुळे मासिक पाळीचं चक्र पूर्व पदावर येईल असं डॉ. कुमटा सांगतात.
कोरोना माहमारीचा काळ अजून संपलेला नाही , परंतु आता लोक कोरोना ला सामान्य नजरेने पाहताना दिसत आहेत . सगळे अधिप्रमाणेच पण ” न्यू नॉर्मल्स ” सोबत घेऊन जगायला शिकले आहेत .