डॉक्टर ! लस घेतलीय आता किती दिवसांनी दारू पिऊ शकतो
कोरोना लसीकरणानंतर घातक ठरू शकते मद्यपान
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर काही दिवस मद्यपान करायचे नाही ,अतिमद्यपान आरोग्यास घातक आहे, असे संदेश समाज माध्यमावर फिरत आहे ;
परंतू लस घेण्यापूर्वी व घेतल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी, की घेऊ नये, याची अधिकृतपणे परिपत्रक काढून कुणीही माहिती दिलेली नाही.
पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे, आरोग्य सेवेतील अधिकारी, कर्मचारी, पोलिसांना लस देण्यात आली .
अनेकांनी पहिली लस घेतलेली आता दुसरी लस घेण्याची तयारी सुरू केली आहे.
पहिला डोस बहुतांशी नागरिकांनी घेतला आणि लस घेतल्यावर किमान सहा आठवडे तरी मद्यपान करू नये असे अनेक जणांचे म्हणणे आहे,
की दारूविषयी कुणाचा शब्द प्रमाण मानावा, किंवा लेखी काहीही नाही.
त्यावर कोणीच बोललेली नाही तर काहींचे म्हणणे आहे की, खुशाल बिंदास्त दारू प्या, तुमच्यावर काही परिणाम होणार नाही .
अशा वेगळ्या वेगळ्या मतांमुळे काही नागरिकांत संभ्रम संभ्रमावस्था आहे . दारू पिऊन कष्ट करणाऱ्यांना काही कोरोना झाला नाही, याचा कोणी विचार केला आहे का?
त्याला कोरोना घाबरतोय काय? रस्त्यावर राहातो, दिले तो खातोय असे म्हणून दारू पिणाऱ्यांच्या दारूच्या अड्ड्यावर झुंबड होत
असल्याने ‘ब्रेक द चेन’ मध्ये शासनाने दारूची दुकाने देखील महिनाभर बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
लस घेताय तर दारू घेऊ नका जिवापेक्षा दारू पिणे महत्वाचे आहे काय? कोरोना पळवायचा असेल तर दारू पिऊन पळणार आहे का?
असा सवाल करून दुसरे तद तज्ञ म्हणाले, ‘लस घेण्यापूर्वी तीन दिवस दारू पिणे योग्य नाही.
‘ दारू पिल्याने त्याचा काय परिणाम होतो हे त्यांना सांगता आले नाही ; परंतू ते योग्य नसल्याचे मत एका डॉक्टरांनी(नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर).सांगितले.