इंटरटेनमेंट

कृष्णाला कोण भडकतंय कोणास ठाऊक…, भाच्यासोबतच्या वादावर पुन्हा बोलला गोविंदा

बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक ही मामा-भाच्याची जोडी सगळ्यांच्या परिचयाची आहे. पण त्यांच्यात सध्या धूसफुस सुरु असल्याचं दिसून येत आहे. काही दिवांपूर्वी गोविंदा ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात पाहुणा म्हणून येणार होता. पण असं कळत आहे की, त्या दिवशी कृष्णाने सेटवर यायला नकार दिला होता. दोघेही सध्या कोणत्या कार्यक्रमामध्ये किंवा बाहेरही एकत्र दिसत नाहीत. अशातच गोविंदानं दोघांच्या नात्यावर केलेलं भाष्य सूचक आहे.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना गोविंदाला विचारण्यात आलं की, कृष्णा अनेक कॉमेडी शोजमध्ये कायम त्याची थट्टा का करत असतो? त्यावर कृष्णा असा का वागतो माहित नाही पण त्याला कोणीतरी हे करण्यासाठी भाग पाडत असल्याचं गोविंदा यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, “तसा कृष्णा चांगला मुलगा आहे. पण आता तो फक्त माझी थट्टा करत नसून तो माझी प्रतिमा मलिन करत आहे. जो कोणी याच्या पाठीमागे आहे आपण त्याला हे करताना पाहत आहोत.”
गोविंदा यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे की, त्यांना कृष्णाच्या करिअरला पाठिंबा दिल्याची शिक्षा मिळत आहे का? ते म्हणाले, “मीही नेपोटिझमचा सामना केला आहे. एक वेळ अशी आली होती की मला काम मिळणं बंद झालं होतं. मी अमिताभ बच्चन यांचाही स्ट्रगल पाहिलेला आहे. ज्यावेळी ते स्टेजवर येत, आजूबाजूचे लोक दूर निघून जात. मला कळत नाही, त्याला पाठिंबा दिल्याची शिक्षा मला मिळत आहे का? त्यांनी त्याला सोडलं आहे मात्र मला पकडलं आहे.”
असे सुरु झाले होते भांडण कृष्णा व गोविंदा यांच्या वादाचे कारण ठरले होते एक ट्वीट. कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहने  एक ट्वीट केले होते. त्यात लोक पैशांसाठी नाचतात असा उल्लेख करण्यात आला होता. हे ट्वीट गोविंदासाठी केले असा गोविंदाच्या कुटुंबियांचा समज झाल्याने त्यांनी कृष्णाच्या कुटुंबियांशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कश्मीराने हे ट्वीट नणंद बहीण आरती सिंगसाठी (कृष्णाची बहीण) टाकले होते असे स्पष्टीकरण कृष्णाने  दिले होते.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *