चंद्राच्या साक्षीने लग्नबंधनात अडकणार स्वाती आणि संग्राम..
चंद्र आहे साक्षीला या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका सध्या एका इंट्रेस्टिंग वळणावर आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत संग्रामने स्वातीला लग्नाची मागणी घातली होती. पण श्रीधरने दिलेल्या धोक्यामुळे हा निर्णय घेणे स्वतीसाठी थोडंसं कठीण होतं पण तिने निर्णय घेतला. आणि तो क्षण आता आला आहे जेव्हा स्वाती आणि संग्राम लग्नबंधनात अडकणार आहेत.

स्वातीच्या आयुष्यात आलेल्या वाईट प्रसंगामुळे आजवर खूप धीराने सामोरी गेली आहे. आता स्वातीच्या आयुष्यात सुखाची चाहूल लागली आहे. स्वाती आता कुठेतरी श्रीधरच्या धोक्यामधून बाहेर पडले आहे. या लग्नामुळे स्वातीच्या आयुष्याला आता नव्याने सुरुवात होणार आहे.
पण या लग्रसोहळ्यात श्रीधर आणि स्वातीचा आमना सामना होईल का? श्रीधरच्या येण्याने स्वातीच्या आयुष्यात नवीन वळण येईल का? हे लग्र निर्विघ्नपणे पार पडेल? स्वाती आणि संग्रामचा हा लग्रसोहळा कसा पार पडला हे नक्की बघा. या आठवड्यात सोम ते शनि रात्री ८:३० वा आपल्या कलर्स मराठीवर. आता लग्रानंतर स्वातीला कोणकोणत्या आव्हानांना समोर जावं लागणार आहे? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
