पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल:रक्तदान करुन साजरी होणार डॉ.आंबेडकर जयंती !
अमरावती जिल्ह्यात एक छोटसं परंतू ७००० लोकवस्तीचं गाव.मराठीचं उगमस्थान. ऐतिहासिक गाव , अमरावतीमधिल गाजलेलं पर्यटनस्थळ.
प्रत्येकवर्ष या ना त्या कारणाने चर्चेत असणा-या या गावात आजही हेवा वाटेल असे कार्यक्रम घेतले जातात.
यावर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अगदीच चार दिवसाआधी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले होते.
त्याच अनुषंगाने आता राज्यभर रक्तदानासारखं श्रेष्ठदान नाही असं समजून हा आदर्श महाराष्ट्र घेईल आणि ठिकठिकाणी रक्तदान होईल.
त्याकरीता कोणत्याही सण-उत्सवाची वाट पहावी लागणार नाही.
सिध्दार्थ युवक मंडळ रिद्धपूर आयोजित या रक्तदान शिबिराकरीता अमरावती जिल्ह्यातुन प्रतिसाद मिळत असून अनेक राजकीय नेत्यांनी या शिबिराला शुभेच्छा दिल्या आहेत.
येत्या १४ एप्रीलला सकाळी १० वाजतापासून शहीद सुभेदार एन के खोब्रागडे स्मारक,वाचनालय,अभ्यासिका केंद्र येथे आयोजित करण्यात आला.
सर्व अमरावतीकरांनी या रक्तदान शिबिरात येवून रक्तदान करावं.असं आवाहन करण्यात येत आहे.
आकाश गजभिये