भवानी देवी ऑलिम्पिकला पात्र होणारी पहिली भारतीय तलवारबाज
टोक्योमध्ये होणाऱ्या २०२० ऑलिम्पिकमध्ये तामिळनाडू ची भवानी देवी तलवारबाजीच्या साब्रे ह्या गटात पात्र झाली आहे. भवानिन समायोजित अधिकरिक रँकिंग च्या आधारावर ऑलिम्पिक पात्रता मिळवली. भवानी सध्या ४५ व्या क्रमांकावर असून आशिया खंडाला २ स्थान मिळाले होते त्यातल्या एका स्थानावर भावनिन आपले नाव शिकामोर्ताब केले.
भवानी देवीची कारकीर्द
तामिळनाडू ची सी. ए. भवानिदेवी ही सलग ८ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेली आहे. रिओ २०१६ च्या ऑलिम्पिक मध्ये पात्र होण्यास अपयश आल्यानंतर तिनं इटलीला जाऊन सराव करण्याचे ठरवले, गेल्या ३ वर्षांपासून ती इटली येथेच सराव करत होती. भवानी कॉमनवेल्थ तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला आहे. तिनं आयर्लंड येते झालेल्या satelite फेन्सिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
टोकियो ऑलिम्पिक २३ जुलै पासून सुरू होणार आहे. ऑलिम्पिक पात्रता मिळवल्यानंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारताच्या खेलमंत्री किरेन रिजिजू ह्यांनी ट्विट करत तिचे अभिनंदन केले आणि चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली आहे.