आता ऑस्ट्रेलियन गिरवणार बीसीसीआयचे धडे
क्रिकेटमध्येही आता एमबीए करता येणार. ऑस्ट्रेलियामधील न्यू साउथ वेल्स विद्यापीठ (एनएसडब्ल्यू) क्रिकेटमधील खास जगातील प्रथम क्रमांकाचे एमबीए सुरू करीत आहे.
या अभ्यासक्रमात बीसीसीआयच्या बलाढ्य बोर्डाच्या क्रिकेट मंडळाच्या आणि इंडियन प्रीमियर लीगच्या शिकण्यांचा अभ्यास केला जाईल.
आयपीएलच्या आयाेजनातील बारकावे आणि त्यासाठीची कार्यपद्धती ही एमबीएचे विद्यार्थी अभ्यासणार आहेत.
यातून जगभरातील क्रिकेट मंडळाच्या प्रशासनावर युवा खेळाडू अभ्यासकांचा समावेश व्हावा, याच उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्लेअर्स असोसिएशनने ही संकल्पना सुचवली हाेती. यावर ऑस्ट्रेलियातील नामांकित विद्यापीठाने तातडीने निर्णय घेतला.
त्यामुळे आता क्रिकेटमध्ये एमबीए करणारे विद्यार्थी हे प्रॅक्टिकलचा विषय म्हणून भारत दाैरा करतील.
तीन वर्षांच्या या पदवीमध्ये स्पोर्ट्स गव्हर्नन्स, मार्केटिंग, फॅन एंगेजमेंट, मीडिया, स्पोर्ट्स लाॅ आणि इव्हेंटबाबत शिकवले जाणार आहे.
या अभ्यासक्रमासाठी एक लाख ऑस्ट्रेलियन डॉलर (५६ लाख) प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.