औरंगाबादमध्ये लॉकडाऊनला स्थगिती; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती.
आजपासुन औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रस्तावित असलेले संपूर्ण कडक लॉकडाऊन नागरिकांच्या प्रचंड विरोधानांतर रद्द करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि प्रशासनाने औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. 31 मार्च 2020 ते 8 एप्रिल पर्यंत या कडक लॉक डाऊन चा कालावधी ठरवण्यात आला होता.
लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक सेवा या सकाळी 78 ते 12 ता कालावधीत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली होती पण जीवनावश्यक सुविधा वगळता इतर सर्व बाबी दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेले होते.सार्वजनिक, खाजगी वाहतूक, खाजगी व्यवसाय , हॉटेल इ. व्यवसायांना या लॉकडाउन मुले नुकसान सहन करावे लागले असते त्यामुळे लॉक डाऊन च्या घोषणेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत होती. बऱ्याच लोकप्रतिनिधींनी या निर्णयाला विरोध केला होता त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, पक्ष यांनी लॉक डाऊन विरोधात आंदोलनाची तयारी केलेली होती आणि याच पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लॉकडाऊन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.यापूर्वी असलेले निर्बंध कायम असतील तसेच जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरात लवकर भरून कोरोनाच्या संदर्भातील उपाययोजना केल्या जातील असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. औरंगाबाद हा देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळणाऱ्या टॉप10 जिल्ह्यामधील एक जिल्हा आहे. मागच्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात रोज सरासरी 30000 रुग्ण कोरोनाबधित होत असताना याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉक डाऊन चा निर्णय घेतला होता पण आता तो स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.