आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई
भारताच्या झिली दालाबेहेरा हिने (४५ किलो) अप्रतिम कामगिरी करत आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
भारताचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले.
कनिष्ठ जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या झिलीने स्नॅच प्रकारात ६९ किलो, तर क्लिन आणि जर्क प्रकारात ८८ किलो असे एकूण १५७
किलो वजन उचलत सुवर्णपदक प्राप्त केले. फिलिन्सिच्या मेरी डियाझ हिने १३५ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले.
४५ किलो वजनी गटाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नसल्याने झिली टोक्योसाठी पात्र होऊ शकली नाही.
मात्र गेल्या वर्षी रौप्यपदक पटकावणाऱ्या झिलीने या वेळी अव्वल कामगिरी नोंदवली. २०१९मध्ये तिने याच स्पर्धेत १६२ किलो वजन उचलले होते.
भारताच्या स्नेहा सोरेनला ५५ किलो वजनी प्रकाराच्या ब गटात तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.