तुम्ही दुपारी झोपता का ? होऊ शकतात हे दुष्परिणाम
अनेक लोकांना दुपारी झोपण्याची सवय असते काही लोकांना तर रोज दुपारची झोप हवी असते परंतु या थोड्या वेळच्या झोपेमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आज आम्ही तुम्हाला या समस्यांविषयी सांगणार आहोत
दुपारच्या झोपेचे तोटे…
_ त्वचा रोगाचा धोका
कफ आणि पित्त दोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते . याचबरोबर रक्त दूषित होण्याची शक्यता असते. यामुळे एक्झिमा सोरायसिस , शीतपित्त आणियासारखे त्वचारोगाचे विकार बाळगू शकतात . केसात कोंडा होऊ शकतो.
_ शरीरातील फॅट्स वाढतात
शरीरातील फॅट्स म्हणजे मेदाचे प्रमाण वाढते, अतिप्रमाणामुळे वजन वाढू लागते वजन वाढल्याने अनेक आजार बाळगतात .
_ कफदोष वाढतो
दुपारच्या झोपेमुळे कफदोष वाढतो यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते .
_ मधुमेहाचा धोका वाढतो
दुपारच्या झोपेमुळे पचनाची क्रिया असून असंतुलित होते.
यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता वाढते.