पहिल्या दिवशी अपघातातून बचावले आणि दुसऱ्या दिवशी नाव कमावले
देहरादून शताब्दी एक्स्प्रेसच्या मध्ये आग लागल्यानंतर मध्यप्रदेशच्या तिरंदाजी संघाचा चमत्कारीकरित्या बचाव झाला.
त्याच्या दुसर्याच दिवशी, ह्या तिरंदाजी संघाने देहरादून येथे ४१ व्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत तीन पदके जिंकली.
पदकविजेते अमित कुमार आणि सोनिया ठाकूर यांची उत्तम कामगिरी आश्चर्यकारक आहे कारण त्यांनी सी -५ बोगी ला लागलेल्या आगीमध्ये सर्व उपकरणे गमावली होती.
परंतु आपत्कालीन परिस्थितीत नवीन उपकरणे आणि गीअर त्यांना मध्यप्रदेश सरकार च्या खेलमंत्री यशोधराजे ह्यांनी केली.
हे उपकरण नवीन असल्यामुळे त्यांना खेळाडू आणि प्रशिक्षक रात्रभर सेट करत होते आणि दुसऱ्यादिवशी ह्या खेळाडूंनी ह्याच उपकरणांवर पदक मिळवली.
“स्पर्धेला फक्त एक रात्र होती. आम्हाला उपकरणे मिळाली, पण ती धनुर्धारकांसाठी नवीन असल्याने ती समायोजित करावी लागली.
कोचिंग स्टाफ आणि धनुर्धारी संपूर्ण रात्र बसून उपकरण साधत बसले,” असे मुख्य प्रशिक्षक रिचपाल सिंग यांनी सांगितलं.
शताब्दी एक्सप्रेस मध्ये लागलेल्या आगी नंतर सर्व खेळाडूंची मनस्थिती बिघडली होती आणि त्यामुळे खेळाडूंची झोप पूर्ण होऊ शकली नाही.
इतक्या बिकट परिस्थितीत त्यांनी ही राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. हा अपघात जीवनातील एक आव्हान आहे आणि असे अनेक आव्हानं जीवनात येणार
व त्यावर तुम्ही नक्की विजय मिळवणार असा उपदेश मध्यप्रदेशच्या खेलमंत्र्यानी तिरंदाजी संघाला दिला.