लाइफस्टाइल

एप्रिल फूल्स डे जगभरात कसा साजरा होतो?


1 एप्रिलला एप्रिल फूल्स डे असतो. यादिवशी आपल्या मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या खोड्या काढून त्यांना प्रॅन्क करतात. जे यामध्ये फसतात त्यांना एप्रिल फूल म्हणतात. एप्रिल फूल्स जगभरात साजरा केला जातो.
एप्रिल फूल्स डे का साजरा करतात?13 जुन 1582 प्रत्येक युरोपियन देशाचे ज्यूलियन कॅलेंडर बदलून ग्रेगोरियन कॅलेंडर पॉप ग्रेगरीकडून करण्यात आले. ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये नवीन वर्ष 1 एप्रिल ऐवजी 1 जानेवारीला होते. अनेक लोकांना याबद्दल माहित नव्हते तर अनेकांनी याला नकार दिला. त्यामुळे बरेच लोकं नवे वर्ष एप्रिल मधेच साजरे करायचे.अशा लोकांना एप्रिल फूल म्हणले जाऊ लागले. त्यामुळेच एक एप्रिल एप्रिल फुल साजरा करण्याची प्रथा पडली आणि नंतर ती जगभर पसरली.
 जगभरात एप्रिल फूल्स डे कसा असतो?ब्राझील – ब्राझीलमध्ये एप्रिल फूल्स डेला ‘खोटं बोलण्याचा दिवस’ असे म्हणतात. वर्तमानपत्रात खोटे दावे छापून येतात. लोक एकमेकांना हास्यास्पद मूर्ख बनवतातफ्रान्स – फ्रान्समध्ये एप्रिल फूल एप्रिल फिश असेही म्हणतात. या दिवशी लोक फिश आकाराचे हुक दुसऱ्यांच्या पाठीवर त्यांच्या माहितीशिवाय लावतात. ज्यांना हे कळत नाही की त्यांच्या मागे फिश लटकवलेले आहे त्यांना एप्रिल फिश असे म्हणतात. या दिवशी फिश च्या आकाराचे केक आणि गिफ्ट्स एकमेकांना देऊन एप्रिल फूल्स डे साजरा होतो.ग्रीस – ग्रीस मध्ये एप्रिल फूल बाबतीत बऱ्याच श्रद्धा आहेत  आहेत. जर या दिवशी कोणाला मूर्ख बनवले तर त्यांचा वर्ष चांगले जाते असा ग्रीस मध्ये समज आहे. जे एप्रिल फुल च्या दिवशी आपल्या मित्रांच्या केलेल्या एप्रिल फूल्सच्या युक्त्या फसवतात त्यांच्या घरचे पीक चांगले उगवते असाही एक समज आहे. आयरलँड – आयर्लंडमध्ये एप्रिल फूल्स निरनिराळ्या पद्धतीने होतो. या दिवशी डाव्या बाजू ऐवजी उजव्या बाजूला गाडी चालवतात. एप्रिल फूल्स च्या दिवशी दुपारपर्यंतच एकमेकांना मूर्ख बनवणे अपेक्षित आहे. त्यानंतर जर असे झाले तर त्यालाच ‘ एप्रिल फुल ‘समजले जाते. आयरलँडमध्ये मीडियाने खोटी बातमी छापण्याची शक्यता असते.पोलंड – “एप्रिल फूल्स डे,सतर्क रहा ” हा वाक्प्रचार पोलंडमध्ये एप्रिल फूल्स च्या दिवशी सतत वापरला जातो. लोक एकमेकांना सल्ला देतात की या दिवशी कोणतीही बातमी कानावर पडली तर त्याला नीट पडताळून बघा.स्कॉटलँड – स्कॉटलंडमध्ये मूर्ख माणसाला कोकिळा  म्हणतात. एप्रिल फूल्स डेला ते ‘कोकिळेची शिकार करण्याचा दिवस’ असे म्हणतात. या देशात एप्रिल फूल्स दोन दिवस साजरा केला जातो. एप्रिल फूल्सच्या  दुसऱ्या दिवशी ‘टेल डे’ साजरा केला जातो या दिवशी लोक दुसऱ्यांना कळू न देता मागून शेपटी लावतात.युनाइटेड किंगडम (युके) – या दिवशी सकाळी लवकर उठण्याची प्रथा आहे. सकाळी लवकर उठून दुपारच्या आत मित्रांची,नातेवाईकांची गंमत करून, त्यांना मूर्ख बनवून एप्रिल फूल्स डे साजरा करतात.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *