पॉलिटीक्स

जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे- सचिन वझे

API सचिन वझे यांचा व्हाट्सअप्प स्टेट्स होतोय वायरल
-मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वझे यांचा एक व्हाट्सअप्प स्टेटस वायरल होतोय. यामध्ये त्यांनी लिहले आहे ” आता जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे ” पण आता हे स्टेटस दिसत नाही आहे .असे समजले जात आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजून सांगितल्या मुळे वझे ह्यांनी हे स्टेटस काढून टाकले आहे.

मनसुख हिरेन हे उद्योगपती मुकेश अंबानीच्या घराजवळ आढळलेल्या स्कॉर्पिओ चे मालक होते.पण त्यांचा संशयित रित्या मृत्यू झाल्याने त्यांच्या मृत्यु मध्ये वझे ह्यांचाही हात असल्याचा वझे ह्यांच्यावर आरोप होत आहे.ह्याच आरोपांमुळे त्यांची शुक्रवारी क्राइम इंटेलिजन्स युनिट मधून नागरिक सुविधा केंद्रा मध्ये बदली केली गेली.
काय लिहले होते वायरल स्टेटस मध्ये
-३ मार्च २००४ रोजी सीआईडि मधील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या आरोपात अटक केली.ती अटक अजूनही अनिर्णित आहे . त्याच इतिहासाची पूनारावृत्ती होणार आहे . माझे सहकारी अधिकारी मला चुकीच्या सापळ्यात अडकवित आहेत . पण यावेळेच्या परिस्थिती मध्ये थोडा फरक आहे . तेव्हा माझ्याकडे कदाचित १७ वर्षांची आशा,धैर्य, जीवन आणि कदाचित सेवा देखिल होती . पण आता मी पुढील १७ वर्ष जगणार ही नाही आणि माझ्याकडे जगण्यासाठी सेवा किंवा धीर ही नाही .
माझ्या मते जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे .

सचिन वझे वरती काय आरोप

  • मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या संदर्भाने महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सचिन वझे यांच्या वर खूनाचा आरोप केला आहे. या पूर्ण घटनेचा तपास महाराष्ट्र ATS आणि NIA करत आहे .

३ मार्च २००४ रोजी काय घडले
-२ डिसेंबर २००२ घाटकोपर बॉम ब्लास्ट चा मुख्य आरोपी ख्वाजा युनूस याच्या मृत्यू प्रकरणी सचिन वझे सोबत १२ पोलिसांना ३ मार्च २००४ रोजी निलंबीत करण्यात आले होते .

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *