पॉलिटीक्स

तामिळनाडूत भाजप 20 जागा लढवणार

26 फेब्रुवारीला केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यामध्ये तामिळनाडू,पश्चिम बंगाल, आसाम,केरळ आणि पुडुचेरी हे राज्य आहेत. निवडणुकीची तारीख जाहीर होताच  या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली. निवडणुका जाहीर झालेल्या पाच राज्यांपैकी तामिळनाडू, पश्चिम बंगाल व केरळ ही तीन महत्त्वाची राज्य आहेत आणि या तीनही राज्यांमध्ये राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित अशी कामगिरी करता आलेली नव्हती.तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणुकीत AIDMK सोबत भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार आहे. भारतीय जनता पक्ष हा आधी तेथील स्थानिक राजकीय पक्षांसोबत गटबंधन करतो व नंतर त्याच पक्षाची ताकद कमी करू पाहतो असा भाजप पक्षाबद्दल अनेकांचा समज आहे. परंतु तामिळनाडू मध्ये भारतीय जनता भारतीय जनता मध्ये भारतीय जनता  पक्षाला असं आतापर्यंत तरी करता आलेले नाही. भारतीय जनता व AIDMK सोबत निवडणूक लढवत असले तरी त्यांच्या दोघांमध्ये मतभेद नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. भाजपने आयोजित केलेल्या एका रॅलीला AIDMK  परवानगी दिली नाही तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाने ती रॅली काढली. हे या मतभेदच उत्तम  उदाहरण आहे. AIDMK हा सुरुवातीपासूनच तामिळनाडूमध्ये बीजेपीच्या हिंदू कार्ड पेक्षा आपल्या द्रविडियन अस्मिता लोकांमध्ये रुजू लोकांमध्ये रुजू घालण्यात यशस्वी ठरला आहे. AIDMK च्या जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठे बदल झाले. प्रमुख विरोधी पक्षाची धुरा सांभाळणारे डी एम के चे करुणानिधी यांचा स्वर्गवास सुद्धा तामिळनाडू राजकारणात बदलाचं कारण ठरला आहे. दोन प्रमुख बड्या नेत्यांच्या निधना  नंतर किंवा  नेत्यांशिवाय ही पहिलीच विधानसभा निवडणूक पार पडणार आहे त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीवर लागलेला आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *