अमेरिकेतील विद्यापीठ लैंगिक अत्याचार पिडीतेला देणार ८ हजार कोटी भरपाई
अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये अनेक महिलांवर लैंगिक शोषण करण्याचा आरोप डॉक्टरवर लावण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत आता युनिव्हर्सिटी पीडित महिलांना १.१ अरब डॉलर म्हणजेच ८ हजार कोटी रुपये देणार आहे. युनिव्हर्सिटीचे स्त्री रोग विशेषज्ञ डॉक्टर जॉर्ज टिंडल यांच्यावर रुग्णांचे लैंगिक शोषण तसंच शिव्या देण्याचा आरोप लावण्यात आला होता. तीन वेगवेगळ्या प्रकरणांसाठी कोर्टानं ही भरपाई घोषित केली आहे. २०१८ नंतर ५०० महिलांनी युनिव्हर्सिटीविरुद्ध तक्रार दाखल केली असून सध्या ही युनिव्हर्सिटी तक्रारींचे केंद्र बनलं आहे. युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांकडून वेबसाईटवर ३.५ लाख विद्यार्थ्यांना मेल पाठवण्यात आले होते. २०१६ मध्ये अशा प्रकारची पहिली तक्रार नोंदवण्यात आली होती. आतापर्यंत अशा अनेक केसेस समोर आल्या आहेत. ज्यात स्त्री रोग तज्ज्ञांचे शोषण करण्यात आले आहे. UAC च्या दाव्यानुसार मागच्या काही वर्षात युनिव्हर्सिटीत अनेक धक्कादायक प्रकरणं समोर आली. २०१८ चे प्रकरण दाबण्यासाठी २१.५ करोड़ डॉलर म्हणजेच जवळपास १, ५५८ करोड़ रुपये रक्कम द्यावी लागली होती. तर दुसऱ्यांदा दिलेल्या किमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही. लैंगिक शाेषण प्रकरणात २०१८ च्या अखेरीस हे प्रकरण समाेर आले हाेते. तेव्हा ५०० महिलांनी विद्यापीठाच्या विराेधात गुन्हा दाखल केला हाेता. त्यानंतर विद्यापीठाने एक तक्रार केंद्र स्थापन केले हाेते. त्यात विद्यापीठातील विद्यार्थिनी, अध्यापक वर्गास हाॅटलाइन व संकेतस्थळाद्वारे तक्रार करण्याचे आवाहन केले हाेते. तेव्हा साडेतीन लाख विद्यार्थ्यांना तक्रारीबद्दल सविस्तर ई-मेल पाठवला होता