२६ फेब्रुवारी ला बंद राहणार देशाचे सर्व बाजार.
धनंजय गिरडे : येत्या २६ फेब्रुवारीला कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स द्वारे भारत बंद चे आवाहन करण्यात आले आहे.शुक्रवारी २६ फेब्रुवारीला देशातील सगळ्या बाजारपेठा बंद राहण्याचा दावा करण्यात येत आहे. जीएसटी च्या तरतुदींची पुन्हा समीक्षा करण्याची मागणी कन्फेडरेशन ने केली आहे.
जीएसटी मध्ये अनेक तरतुदी तर्कहीन असून ते लवकरात लवकर परत घेण्याची तसेच इ- कॉमर्स कंपनी एमेझॉन वर बंदी आणण्याची मागणी कन्फेडरेशन ने केली आहे.
डिझेल आणि पेट्रोल च्या वाढत्या भावासंबधात देशातील सर्वात मोठी ट्रान्सपोर्ट संघटना असलेल्या ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशन ने पण. कॅट च्या व्यापार बंदला समर्थन दिलेलं आहे. सोबतच त्यांनी शुक्रवारी देशभरात चक्का जाम करण्याची घोषणा केली आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जीएसटी परिषद कडून मालं व कर सेवांच्या कठोर नियमांना संपवण्याची मागणी करत देश भरात १५०० ठिकाणी आंदोलन केले जाणार असल्याचे कॅट ने संगितले. आमच्यासोबत ४० हजारांवरून व्यापारी संघटना असून आंदोलनाचा व्याप खूप मोठा असल्याची चेतावणी कॅट तर्फे देण्यात आली.