कायरन पोलार्ड नवीन सिक्सर किंग;धनंजयची हॅट्रिक व्यर्थ
विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या तूफानी फटकेबाजीचा नजराणा क्रिकेटप्रेमींना पुन्हा बघायला मिळाला . श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पोलार्डने सहा चेंडूत सहा षटकार ठोकले . त्याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या युवराज सिंह आणि हर्षल गिब्स यांच्या विक्रमाशी बरोबर केली.पोलार्डच्या या कामगिरीच्या जोरावर पहिल्या सामन्यात वेस्टइंडीजने श्रीलंकेला ४१ चेंडू आणि चार विकेट्स राखत पराभूत केले. याच सामन्यात श्रीलंकन फिरकीपटु अकीला धनजंयने हॅट्रिक घेतली होती. त्यानंतरच्या त्याच्याच पुढच्या ओवरमध्ये पोलार्डने अकीला धनजंयच्या ओवरमध्ये ६ चेंडूत ६ षटकार ठोकले .कायरन पोलार्डने आतापर्यंत एकदिवसीय टी-२० आणि आईपीएल मिळून ४०७ षटकार ठोकले आहेत .
सहा चेंडूत सहा षटकार ठोकणारा तो पहिला कर्णधार व पहिला वेस्टइंडीजचा खेळाडू बनला आहे.याआधी युवराज सिंह आणि हर्षल गिब्ब्स यांनी हा पराक्रम केला आहे .युवराज सिंहने २००७ च्या टी-२० विश्वचषक मध्ये इंग्लैंड विरुद्ध एका ओवरमध्ये सहा षटकार ठोकले होते, तर हर्षल गिब्सनेसुद्धा २००७ च्या टी-२० विश्वचषकामध्येच नेदरलँड विरुद्ध एका ओवरमध्ये सहा षटकार ठोकले होते .तब्बल १४ वर्षांनंतर पोलार्डने या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या तूफानी खेळीसाठी पोलार्डला सामनावीराच्या पुरस्कराने गौरवण्यात आले.टी २० सामन्यात हैटट्रिक घेणारा अकीला धनजंय श्रीलंकेचा तीसरा खेळाडू बनला. याआधी थिसारा परेरालसिथ मलिंगा यांनी हा पराक्रम केला आहे.