एयर कंडीशनरचे तोटे….
उन्हापासून संरक्षण मिळावे, म्हणून हल्ली घरात एसी लावण्याकडे जास्त कल दिसून येतो , शिवाय प्रत्येक ऑफिसमध्ये एसी असल्यामुळे दिवसातील किमान आठ-दहा तास आपल्याला एसीत बसावे लागते . या एसी पासून गारवा मिळत असला तरी त्याचे अनेक तोटे देखील आहेत तुम्ही सतत तिचा वापर करत असाल तर हे नक्कीच जाणून घ्या….
ताप किंवा थकवा :बराच वेळा एसीमध्ये बसल्यावर सतत हलका ताप आणि थकवा जाणवू शकतो. एवढेच नव्हे तर डोकेदुखी आणि चिडचिड होऊ शकते. आपण बाहेर निघून सामान्य तापमानात जाऊन येत असाल तर आपल्याला बऱ्याच दिवस ताप येऊ शकतो.
१) सांधेदुखी :सतत एसीमध्ये बसलेल्यांना गुडघेदुखीचाच त्रास होत नाही तर शरीरातील सांध्यात वेदनांचा कडकपणा देखील येतो त्यांची कार्यक्षमता कमी होते पुढे हाडांशी निगडित रोग होऊ लागतात.
२)रक्तदाब आणि दमा :जर आपल्याला उच्च रक्तदाब आणि दम्याचा त्रास आहे तर आपण एसीमध्ये बसणे टाळावे.
३) लठ्ठपणा : एसीमुळे शरीरातील लठ्ठपणा वाढू शकतो. तापमान कमी असल्याने शरीर सक्रिय होत नाही आणि ऊर्जेचा योग्य वापर होत नाही त्यामुळे लठ्ठपणा वाढतो.
४)त्वचेची समस्या :एसी त्वचेवरील नैसर्गिक ओलावा कमी करते, आणि त्वचेला कोरडी करते त्यामुळे त्वचेची समस्या उद्भवते.
५) कार्यक्षमतेवर परिणाम :एसीमध्ये बसल्याने शरीराचे तापमान कृत्रिमरीत्या कमी होते. त्यामुळे पेशींमध्ये आकुंचन होते आणि सर्व अवयवांमध्ये रक्ताचा प्रवाह योग्यरित्या होत नाही. अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
६)मेंदूवर परिणाम :एसीचे तापमान कमी असल्याने मेंदूच्या पेशी आकुंचन पावतात. त्यामुळे मेंदूची क्षमता आणि कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे वारंवार चक्कर देखील येऊ शकतात.