आरोग्य संजीवनी पॉलिसी च्या अंतर्गत आयआरडीएआय चा मोठा निर्णय
आता मिळणार १० लाख पर्यंतचा इन्शुरन्स
देशात आरोग्य विमा संरक्षण वाढविण्यासाठी विमा क्षेत्राचे नियामक IRDAI ने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने ( आयआरडीएआय) प्रमाणित आरोग्य विमा पॉलिसी ‘आरोग्य संजीवनी पॉलिसी’ मधील कव्हरेजची किमान मर्यादा ५०,००० हजार रुपये कमी केली आहे तर कमाल मर्यादा वाढवून १० लाखांपर्यंत केली आहे. आयआरडीएआयने गेल्या वर्षी जुलैमध्ये आरोग्य संजीवनी नामक आरोग्य विमा पॉलिसी संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
यामध्ये विमा कंपन्यांना किमान १ लाख रुपये आणि जास्तीत जास्त ५ लाख रुपयांपर्यंतचे सक्तीचे विमा संरक्षण देण्यास सांगण्यात आले होते. आता त्याची व्याप्ती वाढवून १० लाख करण्यात आली आहे.
हा नियम १ मे २०२१ पासून अंमलात येईल- आरोग्य आणि विमा कंपन्यांना जारी केलेल्या परिपत्रकात आता आयआरडीएआयने म्हटले आहे की,आरोग्य संजीवनी पॉलिसीअंतर्गत उपलब्ध असणारी व्याप्ती वाढविण्यासाठी विद्यमान मार्गदर्शक सूचनांमध्ये आंशिक सुधारणा करून आता विमा कंपन्या आरोग्य संजीवनी ची सुधारित पॉलिसी अवलबनात आणतील .१ मे २०२१ च्या कालावधीत किमान ५० हजार रुपये आणि जास्तीत जास्त १० लाख रुपये विमा संरक्षण द्यावा लागेल.
या कंपन्यांना सूचना लागू होणार नाहीत*आयआरडीएआयने म्हटले आहे की,नवीन सुधारित मार्गदर्शक तत्त्वे ईसीजीसी आणि एआयसी या दोन सरकारी सामान्य विमा कंपन्यांना लागू होणार नाहीत. एग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (एआयसी) कृषी क्षेत्रासाठी आहे तर ईसीजीसी निर्यातदारांना आधार देणारी निर्यात पत हमी कंपनी आहे.
आरोग्य संजीवनी धोरणाचे फायदेआरोग्य संजीवनी धोरणामध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि प्रवेशानंतरचा उपचार आणि मोतीबिंदूचा उपचार खर्च कव्हर होतो. ही एक प्रमाणित आरोग्य विमा पॉलिसी आहे जी पॉलिसीधारकाच्या मूलभूत गरजांना विचारात घेऊन तयार केली आहे.
लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल झाल्यास, विमा कंपनी भरपाई करेल यापूर्वी आयआरडीएआयने,कोरोना लस घेण्यास घाबरलेल्या लोकांना मोठा दिलासा दिला आहे. आयआरडीएआयने म्हटले आहे की,कोरोना लसीनंतर आपले आरोग्य बिघडले आणि आपल्याला रुग्णालयात दाखल केले, तर आरोग्य विमा कंपनी खर्च सहन करेल. हॉस्पिटलायझेशन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीअंतर्गत पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार हे संरक्षण दिले जाते.