वाढदिवसाच्या दिवशी आमिर खान करणार नव्या चित्रपटाची घोषणा
बॉलिवूड मधील सुपरस्टार मिस्टर परफेक्टशनलिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने आज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून मोठा खुलासा केला आहे. आमिर खानच्या जन्म दिनाच्या दिवशी ते त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा करणार आहे.
आमिर खान सध्या लालसिंग चड्डा या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. पण आता लालसिंग चड्डा नंतर आमिरच्या हातात कोणता चित्रपट असणार आहे हे तर गुपितच आहे. आणि हे गुपित आमिर खान १४ मार्च २०२१ रोजी म्हणजेच त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी सांगणार आहे.
आमिर खानला त्यांच्या समर्पणासाठी ओळखले जाते. १-२ वर्षातून एखादा चित्रपट प्रदर्शित करणारा परंतु ब्लॉकबस्टर चित्रपट आणि प्रेक्षकांच्या आठवणीत राहील असे चित्रपट तयार करण्यात आमिरची ओळख आहे. त्यांचा दंगल आणि लगान चित्रपट त्यांची प्रतिभा सिद्ध करणारा आहे. त्यामुळे त्यांचा चित्रपट म्हणजे ‘बेस्ट इन्व्हेस्टमेंट’ असे त्यांचे चाहते म्हणतात.
सध्या लालसिंग चड्डा या चित्रपटाचं चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात सूरु आहे. त्यांच्या या चित्रपटाची वाट चाहते आतुरतेने पाहत आहेत सोबतच आता लवकरच त्यांच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू करणार आहे. लालसिंग चड्डाच्या शूटिंग दरम्यान आमिर खानने मोबाईल वापरणार नसल्याचं सांगितलं होतं. आता त्यांच्या या मेहनतीचं फळ लवकरच बघायला भेटेल, अशी आशा आहे.