पहिल्या दिवशी भारताच वर्चस्व
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसखेर टीम इंडियाने 24 धावा करुन 1 विकेट गमावली आहे. तर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा नाबाद आहेत. पुजारा 15 तर रोहित 8 धावांवर नाबाद आहेत. तर शुबमन गिलच्या रुपात टीम इंडियाने 1 विकेट गमावली. त्याआधी इंग्लंड ने नानेफेक जिंकून फलांदाजी निर्णय घेतला परंतु इंग्लंड ला या निर्णया चा फायदा घेता आला नाही. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात 205 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाच्या फिरकीसमोर इंग्लंडने पुन्हा एकदा लोटांगण घातलं आहे. इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपल्या फिरकीचा जलवा दाखवला. अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आर अश्विनने 3 बळी घेत त्याला चांगली साथ दिली. तसेच मोहम्मद सिराजने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.पण, पहिल्या दिवशी वातावरण तापलेलेही पाहायला मिळाले. बेन स्टोक्स आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात शाब्दीक चकमक झाली. अंपायर नी मध्यस्थी केल्यानं वाद तिथेच मिटला. पण, त्यामागचं कारण सामन्यानंतर समोर आलं. मोहम्मद सिराजनं ते सांगितलं.सिराज म्हणाला,”ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. त्यामुळे संयम राखून गोलंदाजी करण्याचा आमचा प्लान होता. आपल्याकडे दोनच जलदगती गोलंदाज आहे, हे विराटनं आधीच सांगितले होते. त्यामुळे त्यांचा योग्य वापर करणे महत्त्वाचे होते आणि दोन ओवर टाकल्यानंतर विराटनं इशांतला दुसऱ्या एंडवरून गोलंदाजी करण्यासाठी रोटेट केलं.” ”ऑस्ट्रेलिया असो किंवा भारत मला १०० टक्के योगदान द्यायचेय हेच माहित आहे. त्यामुळे मी प्रत्येक चेंडू योग्य लाईन लेंथने टाकत होतो. त्या षटकात बाऊन्सर टाकल्यानंतर बेन स्टोक्सनं मला शिवी दिली. हे मी विराट ला सांगितले आणि त्यानं पुढील परिस्थिती हाताळली, असेही सिराज म्हणाला.या नंतर त्यांच्यात शाब्दीक वाद झाला पण नंतर अंपायर नी मध्यस्थती करून वातावरण शांत केल.इंग्लंड च्या निराशाजनक फलांदजी मुळे आता परत एकदा सगळ्यांच लक्ष खेळपटी कडे लागले आहे.यानंतर आता नाबाद असलेले फलंदाज रोहित आणि पुजारा दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या डावला कशाप्रकारे सुरुवात करतात, याकडे सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांच लक्ष लागलं आहे.