पॉलिटीक्स

आर्मी कॅम्पवर हल्ला झाला तरच भाजपा पश्चिम बंगालमध्ये विजयी होऊ शकते- प्रशांत किशोर

पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूका घोषित झाल्या. त्यामूळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरूवात केली आहे त्यातच भाजपानी जय्यत तयारी केली आहे . त्यामूळे नेते काही न काही भाष्य करत आहे. त्यातच राजकीय रणनितीतज्ञ प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडे वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की.जर देशाच्या सैनिकांच्या कॅम्प वरती अचानक आतंकवादी  हल्ला झाला तरच भाजपा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत पर्यंत पोहचू शकतात. त्यामुळे दोन वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकींची आठवण येते कारण निवडणुकीच्या अगदी आधीच म्हणजे १४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी पुलवामा येथे सैनिकांच्या गाड्यावर आतंकवादी हल्ला झाला होता.  त्या हल्ल्यात ४० भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर भारत सरकारने एअर स्ट्राइक  करून आतंकवादी संघटनेचे ठिकाणे उद्ध्वस्त केले होते .त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला भरघोस बहूमत मिळाले होते.
  पुढे ते म्हणाले भाजपाने पश्चिम बंगालमध्ये तीन अंकी जागा जिंकल्या तर मी माझं राजकीय रणनितीतज्ञ चे काम सोडून दे आणि पुन्हा हे काम कधीच कोणासाठी करणार नाही. त्यामूळे बंगालची ही निवडणूक खूप नेत्यांचे राजकीय भविष्य ठरवणार आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *