स्पोर्ट्स

जस’प्रीत’ बुमराहचा ‘अनुपम’ विवाह

आपल्या अचूक आणि लयबद्ध गोलंदाजीच्या बळावर भल्याभल्या फलंदाजांची विकेट काढणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच लग्नगाठीत अडकणार आहे. यासाठी त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून माघार घेत बीसीसीआयकडे लग्नासाठी सुटी मागितली आहे. मात्र, तो नेमका कुणासोबत विवाहबद्ध होतोय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीसुद्धा मागील अनेक दिवसांपासून त्याचे नाव दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्याशी जोडले जात आहे. यामुळे तो नेमका तिच्याशीच लग्न करतोय का?, हे अद्याप गुलदस्त्याच आहे.

कोण आहे जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह हा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. ६ डिसेंबर १९९७ रोजी जन्मलेला बुमराह मुळचा गुजरातच्या अहमदाबादचा आहे. २३ जानेवारी २०१६ रोजी त्याने भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. भारताकडून त्याने आजवर १९ कसोटी, ६७ एकदिवसीय आणि ४९ टी-२० सामने खेळले आहेत. या सर्व प्रकारांमध्ये त्याने आजवर तब्बल २५० विकेट घेतल्या आहेत. आपल्या अचूक यॉर्करच्या शैलीमुळे त्याने जागतिक क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारलेली आहे. शिवाय, वेग आणि अचुकता याचा अत्यंत योग्य मेळ साधत त्याने आजवर जगभरातील दिग्गज फलंदाजांना बाद केले आहे.                                                                                                                                                      

 दाक्षिणात्य अभिनेत्रीशी संबंधाची चर्चा

अनुपमाने तिची अभिनय प्रवासाची सुरुवात सह-अभिनेत्री नवीन पॉली यांच्याबरोबर मल्याळम भाषेत प्रेमाम ( २०१ ) या चित्रपटातून केली, जी पैसे कमाविण्यात यशस्वी झाली. या चित्रपटा नंतर, त्याला जेम्स आणि एलिस (२०१) या आणखी एका मल्याळम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारनसुद्धा त्याच्याबरोबर मुख्य भूमिका साकारत होते.                                                                                                                                       

  गोव्यात चढणार बोहल्यावर

डेस्टिनेशन वेडिंग हा जरी ट्रेंड असला तरी सध्या कोरोना च्या पार्श्वभूमी वर भारत बाहेर लग्न नाही करता येणार म्हणून गोव्यात लग्न करायचा निर्यण घेतला असेल अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत

Share and Enjoy !

Shares

2 thoughts on “जस’प्रीत’ बुमराहचा ‘अनुपम’ विवाह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *