लॉकडाउन मध्ये सर्वसामान्यांना फटका तर अब्जाधीशांचा फायदा.
कोरोना महामारीला रोखण्यासाठी झालेल्या लॉकडाउनमुळे लाखो लोक बेरोजगार झाले,अनेक छोटे मोठे धंदे बंद पडले.दुसरीकडे मात्र बड्या उद्योजकांनी या संकट काळात बक्कळ कमाई केली. Huran Global Rich List 2021 ने दिलेल्या माहिती नुसार भारतात गेल्या वर्षभरात अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे .देशात ४० नव्या अब्जाधीशांचा समावेश झाला आहे आणि यासोबतच भारतात अब्जाधीशांची संख्या १७७ वर पोहोचली आहे.
रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे देशातील सर्वात श्रीमंत म्हणून अव्वल स्थान कायम आहे . अंबानी यांची एकूण संपत्ती ८३ अब्ज डॉलर्स आहे . मागील वर्षभरात अंबानी यांच्या संपत्तीत २४% वाढ झाली आहे.
अंबानी पाठोपाठ गुजरात मधील व्यापारी गौतम अदानी हे ४८वे स्थान पटकावून भारतातील दुसरे श्रीमंत ठरले आहेत . अहवालानुसार कोरोनाच्या संकटात देखील अदानी यांची मालमत्ता दुप्पट वाढली आहे.अदानी यांच्या मालमत्तेत १२८% वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती ३२ अब्ज डॉलर्स आहे.
देशातील टॉप ५ श्रीमंत उद्योगपती
१. मुकेश अंबानी – ८व्या स्थानी (६.१ लाख कोटी रु )
२. गौतम अदानी – ४८व्या स्थानी (२.३४ लाख कोटी रु )
३. शिव नादार – ५८व्या स्थानी (१.९४ लाख कोटी रु )
४. लक्ष्मी मित्तल – १०४व्या स्थानी (१.४० लाख कोटी रु )
५. सायरस पूनावाला – ११३व्या स्थानी (१.३५ लाख कोटी रु ).