लाइफस्टाइल

चंदनाचे हे फेस पॅक बनवतील चेहरा आणखी चमकदार !

तुम्हीही करू शकता ट्राय…

प्रत्येक जण आपला चेहरा सुंदर करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो, आपला चेहरा सुंदर आणि निरोगी दिसण्यासाठी बऱ्याच प्रकारच्या उत्पादनांचा तो वापर करत असतो.
याचा एक प्रयोग फार जुन्या काळापासून सुरू आहे तो म्हणजेच “चंदन” अनेक वर्षांपासून लोक चंदनाचा वापर करत आहेत.आणि चंदन हे चेहर्‍यासाठीही खूप फायदेशीर ठरत आहे.चंदनाचे लाकूड उगाळणयचा कंटाळा येत असेल तर,आपण चंदनाचे पावडरही वापरू शकता.परंतु तुम्हाला चांगला प्रभाव मिळवायचा असेल तर तुम्ही घरगुती चंदनाची पेस्ट करून लावू शकता,वास्तविक चंदन हे केवळ आपला चेहरा सुंदर बनवत नाही तर आपल्या चेहऱ्यावरचे मुरूम डाग हेसुद्धा घालवते.

चंदनाचा वापर कसा करायचा?
आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला आणखी चमकदार बनवण्यासाठी आणि मुरमापासून कायमची मुक्तता मिळवण्यासाठी पाच ग्रॅम चंदना मध्ये दोन ग्रॅम कापूर घालून त्यात एक चमचा गुलाब पाणी घाला,आणि त्याची जाड पेस्ट बनवा,आता ही पेस्ट फेसपॅक प्रमाणे आपल्या चेहऱ्याला लावा आणि पंधरा मिनिटे तशीच ठेवा ,आणि ती पूर्ण चेहऱ्यावर सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका .

चंदन बदाम आणि दुधाचा फेस पॅक:
जर आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग घालवायचे असतील तर, चंदनाच्या पावडर मध्ये दोन चमचे दूध घाला आणि त्यात एक चमचा बदाम पावडर टाकून त्याची पेस्ट बनवा या तीनही घटकांना चांगली मिक्स करा ,व नंतर चेहऱ्याला लावा आणि ती त्वचेवर कोरडी झाल्यानंतर चेहरा पाण्याने धुऊन काढा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग तर निघून जातीलच पण तुमचा चेहर्‍याची कांतीही सुधारेल.

चंदन, तेल ,हळद आणि कापूर फेस पॅक:
एक चमचा हळदी मध्ये की चिमूटभर कापूर मिसळा आणि त्यामध्ये चंदन तेल टाकून त्याची पेस्ट बनवा रात्री झोपण्यापूर्वी फेसपॅक प्रमाणे ही पेस्ट चेहऱ्याला लावा, आणि सकाळी उठल्यावर साध्या पाण्याने धुऊन काढा .
यामुळे तुमचा चेहरा सुंदर होईलच व मुरुमापासून पासूनही तुमची मुक्तता होईल.

चंदन आणि दही फेस पॅक:
एक चमचा चंदन पावडर घ्या त्यात अर्धा चमचा मध आणि एक चमचा दही मिसळा. या तिन्ही घटकांचे व्यवस्थितपणे पेस्ट बनवा आणि फेस पॅक प्रमाणे चेहऱ्याला लावा पंधरा मिनिटे तसाच चेहऱ्यावर घेऊन नंतर साध्या पाण्याने धुवून काढा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील घाण निघून जाईल आणि त्वचा चमकदार होईल.

चंदन गुलाब पाण्याचा फेस पॅक:
चेहरा वरील मुरूम घालवण्यासाठी गुलाब पाणी आणि चंदन यांचा फेस पॅक बनवा हा फेस पॅक तयार करण्यासाठी एक चमचा गुलाबपाणी आणि एक चमचा चंदन यांना व्यवस्थित मिसळून घ्या, आणि जाडसर पेस्ट बनवून घ्या याची पेस्ट बनवल्यानंतर दहा मिनिटे तशीच फेसपॅक प्रमाणे चेहऱ्यावरती राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुऊन काढा चेहरा कोरडा झाल्यानंतर त्याच्यावरती त्यावर मॉइश्चरायझर लावा.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *